Shaista Parveen-Atique Ahmed Sarkarnama
देश

Atique Ahmed News : अतिकच्या खुनापूर्वी त्याच्या पत्नीने सीएम योगींना लिहिलेले पत्र आले पुढे : 'तुम्ही हस्तक्षेप न केल्यास माझी मुलं, पती, दीराचा...'

शाइस्ताने योगी सरकारमधील एक मंत्री आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांवर अतिक अहमदच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

लखनऊ : गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या खुनानंतर अतिक अहमद आणि त्याच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरू झाली आहे. अतिकच्या पत्रानंतर त्याची पत्नी शाइस्ता परवीन हिने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्रात शाइस्ताने योगी सरकारमधील एक मंत्री आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांवर अतिक अहमदच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. शाइस्ता सध्या अटकेच्या भीतीने फरारी आहे. (After Atique Ahmed's murder, his wife's letter to Yogi came forward)

अतिक अहमद याची पत्नी शाइस्ता परवीन हिने २७ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिले होते. उमेश पाल याच्या हत्येनंतर तीन दिवसांनी आणि अतिक व अशरफ अहमद यांच्या खुनाच्या ४७ दिवस आधी शाइस्ताने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने एका मंत्र्यांवर आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांवर कटाचा गंभीर आरोप केला होता.

शाइस्ता हिने पत्रात म्हटले आहे की, ‘बहुजन समाज पार्टीने जेव्हा मला प्रयागराजमधील महापौरपदाचा उमेदवार जाहीर केले. तेव्हापासून तुमच्या सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री प्रयागराजचे महापौरपद आपल्याकडे राखण्यासाठी आम्हाला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा कट रचत होता. त्या कटाचा परिणाम म्हणून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, त्याच्या खुनाचा आरोप माझ्या पतीवर लावण्यात आला.

उमेश पाल खून प्रकरणात अश्रफ आणि अतिक यांना चौकशीसाठी प्रयागराजला आणण्याची चर्चा सुरू असतानाच शाइस्ता परवीनने हे पत्र लिहिले होते. त्यानंतर अतिक अहमद आणि अशरफ पोलिसांच्या चकमकीला घाबरू लागले होते.

शाइस्ताने पत्रात पुढे म्हटले आहे की, 'प्रयागराज पोलिस पूर्णपणे तुमच्या मंत्र्याच्या दबावाखाली काम करत आहेत. या प्रकरणात रिमांडच्या बहाण्याने माझे पती अतिक आणि माझे दीर अशरफ यांना अनुक्रमे अहमदाबाद आणि बरेली तुरुंगातून काढून वाटेत त्यांचा खून करण्याचा कट आहे. यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांनी अतिक अहमदच्या खुनाचा सुपारी त्यांच्या विरोधकांकडून अगोदरच घेऊन बसले आहेत. तुमच्या ‘मिठ्ठी में मिला देंगे’ या वक्तव्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यांना माझे पती आणि दीराच्या हत्येचा कट अंमलात आणण्याची आयती संधी मिळाली आहे. यात तुम्ही हस्तक्षेप केला नाही, तर माझा नवरा, दीर आणि मुलांचा खून होईल.

दरम्यान, शाइस्ताने पत्रात लिहिल्याप्रमाणे अगोदर अतिकच्या एका मुलाचा एन्काउंटर करण्यात आला, तर त्यानंतर अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना दोघांचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT