Donald Trump  Sarkarnama
देश

Donald Trump : इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर आता ट्रम्प टार्गेटवर? व्हाईट हाऊसमध्ये बॅरिकेट तोडून घुसली कार; सुरक्षा रक्षकांनी काय केलं पाहा

Donald Trump : अमेरिका आणि इस्रायल या देशांनी मिळून इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनेई यांची हल्ला करुन हत्या करण्यात आली आहे.

Amit Ujagare

Donald Trump : अमेरिका आणि इस्रायल या देशांनी मिळून इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनेई यांची हल्ला करुन हत्या करण्यात आली आहे. गेल्या ११ दिवसांपासून हे युद्ध सुरु असून यामध्ये आत्तापर्यंत हजारो निपराध नागरिक ठार झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या टार्गेटवर आहेत. त्यातच ट्रम्प यांचं अधिकृत सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये अचानक एक कार घुसल्यानं मोठी खळबळ उडाली.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी स्थित व्हाईट हाऊस परिसरात बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. अत्यंत हायसिक्युरिटी असलेल्या ट्रम्प यांच्या कार्यालय आणि निवास परिसरात एका व्यक्तीनं बॅरिकेट्स तोडून कार घुसवली. यानंतर तात्काळ तिथले सुरक्षा रक्षक अलर्ट झाले आणि त्यांनी सर्व परिसराची नाकाबंदी केली. तसंच इतर सुरक्षा एजन्सीजनाही अलर्टचा संदेश देण्यात आला. दरम्यान, बॅरिकेट्स तोडून आत घुसणाऱ्या कारचालकाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे Lafayette Square भागात जे व्हाईट हाऊसच्या थेट उत्तर भागात आहे. या ठिकाणी एक कारचालक भरधाव वेगात सुरक्षेच्या हेतून लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडून आता घुसला. पण दिलासादायक बाब ही आहे की या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी एजन्सी 'युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस'च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे प्रकरण एका संशयीत वाहनाशी संबंधित आहे. तसंच याची सविस्तर चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर व्हाईट हाऊसच्या आसपासच्या प्रमुख रस्त्यांना बंद करण्यात आलं आहे. यामुळं सकाळच्या धावपळीच्या कालावधीत वाहतुकीवर परिणाम झाला. सरकारी कर्मचारी आणि इतर खासगी कंपन्यांचे कर्मचारी आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. संशयित कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

युद्ध काळातच घडली घटना

ही घटना अशा वेळेस घडली आहे जेव्हा अमेरिकेनं इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. त्यामुळं अमेरिकेत सर्वच प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. विशेषतः राजधानी वॉशिंग्टन डीसी इथं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. तसंच आपत्कालीन वाहनं देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. तसंच तपासणीनंतर हळूहळू वाहनं सोडली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT