air plane crash .jpg Sarkarnama
देश

Air India flight Crash: ज्याची भीती होती, तेच घडलं..! विमानातील 204 प्रवाशांचा मृतदेह काढले बाहेर; पोलिस आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती

Ahmedabad Air India flight Crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचाभीषण अपघाताची माहिती समोर आल्यानंतर यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली होती. या अपघातात सर्वच विमान प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Deepak Kulkarni

Ahmedabad News: गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत कोसळलं आहे. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पायलटचा ताबा सुटला अन् अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान (Air India flight Crash ) कोसळलं. 'AP' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघाताची माहिती समोर आल्यानंतर यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) हेही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली होती. या अपघातात सर्वच विमान प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच मेडिकल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

विजय रुपाणी यांच्या निधनासंदर्भात अधिकृतरित्या अजून घोषणा करण्यात आलेली नाही.पण आत्तापर्यंत दोनशे चार प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे.त्यांनी यावेळी अपघात प्रचंड भयानक असून विमानातील प्रवाशांची वाचण्याची शक्यताही कमीच असल्याच म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 हून अधिक मृतदेह काढण्यात आले आहेत. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणार्या विमानाने अहमदाबादहून गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी धावपट्टी 23 वरून टेकऑफ केले होते. धावपट्टी 23 वरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमान जमिनीवर कोसळले. अ

अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा अपघात झाला आहे. याच भागात हे वैद्यकीय महाविद्यालय आहे. खानावळीच्या इमारतीमध्ये विमान घुसल्याचे समोर आले आहे. यावेळी विद्यार्थी, डॉक्टर जेवण करत होते. त्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्रातील काही प्रवासी व क्रू मेंबरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नीही या विमानात होती. विमानातील 10 क्रू मेंबरमध्ये तिचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील आणखी तीन क्रू मेंबरही आहेत.

एअर इंडियाचे बी 787 ड्रीमलायनर विमानाचा आज दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी वस्तीगृहावरच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी काही विद्यार्थी व डॉक्टर वसतिगृहातील खानावळीमध्ये जेवण करत होते,अशी माहिती समोर येत आहे.

त्यांच्यासह मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार आणि महादेव पवार हे महाराष्ट्रातील चौघे जण विमानातून प्रवास करत होते. महाराष्ट्रातील एकूण आठ जणांची नावे सध्यातरी समोर आली आहेत. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढत चालला आहे. अपघातामध्ये नेमका किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याबाबतही प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT