Mamta Banerjee Sarkarnama
देश

West Bengal Vidhan Sabha News : बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर ; 'या' कठोर शिक्षेची तरतूद!

Mayur Ratnaparkhe

West Bengal Mamata Banerjee Goverment News : बंगाल विधानसभेत मंगळवारी बलात्कार विरोधी विधेयक सादर केले गेले, ज्याला एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकात बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषीस फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना विना जामीन जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केली गेली आहे. विधानसभेत विधेयकावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विधेयकास ऐतिहासिक संबोधले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) म्हणाल्या की, बलात्कार प्रकरणातील दोषीला कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. विधानसभेत या विधेयकावरील चर्चेत भाजप आमदार शिखा चॅटर्जी, अग्निमित्रा पॉल आणि शुभेंदु अधिकारी यांनीही आपले मत मांडले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या विधेयकाच्या तरतूदीनुसार आम्ही तपासाला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी एक विशेष अपराजिता टास्क फोर्सचे गठण करू. ज्यामुळे निर्धारित वेळेत महिला-बाल गुन्ह्यांच्या प्रकरणांचा तपास करून आरोपींना शिक्षा दिली जाऊ शकेल.

बंगाल सरकारच्या या 'अपराजिता महिला आणि बाल विधेयक २०२४'चा उद्देश दुष्कर्म आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित नवीन तरतूदींमध्ये सुधारणा करून महिला आणि मुलांसाठी सुरक्षा भक्कम करणे आहे. मागील महिन्यात कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्याप शांत झालेला नाही. राज्यात महिला सुरक्षेसाठी मोठी पावलं उचलण्याची मागणी होत आहे.

अशावेळी राज्य सरकारने सोमवारी विधानसभेचे दोन दिवसीय सत्र बोलावण्याची घोषणा केली होती. या विशेष सत्रात राज्याचे कायदा मंत्री मोलॉय यांनी बलात्कार विरोधी विधेयक सादर केले. तेच विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी(Suvendu Adhikari) यांनी म्हटले की, आमची इच्छा आहे की विधेयकाचे कायद्यात रुपांतरण करून तो लवकरता लवकर लागू व्हावा.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज येथी बलात्कार आणि हत्या प्रकरणात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी सीबीआयने अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, संदीप घोष यांची अटक भ्रष्टाचार प्रकरणात केली गेली आहे. खरंतर तपासादरम्यान संदीप घोष यांच्यावर मेडिक कॉलेजच्या माजी अधिकाऱ्याने भ्रष्टाचारे गंभीर आरोप केले होते, ज्याचाही सीबीआयने तपास सुरू केला होता. अशावेळी ९ ऑगस्टो रोजी जेव्हा मेडिक कॉलेजमध्ये डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाली, या प्रकरणात संदीप घोष यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT