Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : 'इंडिया' आघाडीचा मेळ काही लागेना; आता ममतांनंतर केजरीवालांचीही मोठी घोषणा

INDIA Alliance : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार

Sunil Balasaheb Dhumal

Panjab Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील भाजप विरोधक २६ पक्ष एकत्र आले होते. त्यांनी इंडिया आघाडी स्थापन करून लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारू रोखण्यासाठी रणनीती आखली होती. आता मात्र या इंडिया आघाडीतून अनेक प्रमुख पक्ष बाहेर पडू लागले आहेत. आता आपनेही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा मेळ काही बसत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

इंडिया आघाडीसाठी प्रमुख भूमिका घेतलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा भाजपशी घरोबा केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी 'एकला चलो'चा नारा दिला. झारखंचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच चंडिगढ महापालिकेच्या महापौर पदासाठी घडलेले राजकीय नाट्य देशभर चर्चेले गेले. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि चंडिगढमधून आप स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली.

सध्या देशात लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. महायुती आणि इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) घटक पक्षांत जागावाटप सुरू आहे. मात्र, अनेक राज्यांत जागांबाबत इंडियातील पक्षांत एकमत होताना दिसत नाही. यातूनच अरविंद केजरीवाल यांनी पंजाबबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, पंजाबमधील सत्ता तुम्ही हाती दिली, तशी आगामी काळात होणारी लोकसभामधेही सत्ता द्या. पुढच्या 15 दिवसांत सगळे उमेदवार आम्ही घोषित करणार आहोत. निवडणुकीत आपच्या सर्व 14 उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनच केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीत असूनही आप आणि काँग्रेसमध्ये काय वाद होत होते. पंजाबमध्ये यापूर्वी आपचे नेते काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास विरोध करत होते, तर आप इंडिया आघाडीचा भाग असूनही मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या 'एक थी काँग्रेस' या विधानाचीही खूप चर्चा झाली होती. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३, तर चंडिगढची एक अशा १४ जागा आप लढणार असल्याची घोषणाच केजरीवाल यांनी केली आहे. हा इंडिया आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT