Ncp News : अमोल कोल्हेंचा पक्ष प्रवेश लवकरच!; अजितदादांच्या नेत्याचे मोठे विधान

Dharmarao Baba Atram on Amol Kolhe : शरद पवारांसोबत असलेले अमोल कोल्हे पुन्हा चर्चेत आले आहेत...
Ajit Pawar and Dr. Amol Kolhe
Ajit Pawar and Dr. Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Ncp Politics News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने अजित पवार पक्षात उत्साह आहे. आमदारांमध्ये यामुळे एक सकारात्मक संदेश गेला आहे. आता राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी Sharad Pawar यांच्या सोबत असलेल्या खासदार अमोल कोल्हेंबाबत मोठा दावा केला आहे.

Ajit Pawar and Dr. Amol Kolhe
Sunil Tatkare : गितेंना पाडणारा भाजपचा नेता म्हणतोय, यंदाच्या निवडणुकीत रायगडमधून तटकरेंचा कडेलोट करायचाय !

'पवारांनी आराम करावा'

अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली, त्यावेळी अमोल कोल्हे हे अजित पवारांसोबत होते; पण अजित पवारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर ते थेट शरद पवारांसोबत दिसून आले. ते अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता मंत्री अत्राम यांनी अमोल कोल्हेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शरद पवार यांनी आता आराम करावा आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे. महाराष्ट्रात शरद पवारांपेक्षा अजित पवारांचा चेहरा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नसल्याचे मंत्री अत्राम म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार?

शरद पवार गटाने खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तरीही अमोल कोल्हे हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. सध्या विद्यमान चार खासदार आमच्यासोबत आहेत. त्या चारही जागा आम्ही लढणार आहोत. यासोबतच भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह एकूण 9 जागांवर आमचा दावा असल्याचे आत्राम यांनी सांगितले.

काँग्रेसचे अनिस अहमदही राष्ट्रवादीत येणार?

विदर्भातील काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री अनिस अहमदही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट ) प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अनिस अहमद हे राष्ट्रवादीत गेल्यास विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का असेल.

R

Ajit Pawar and Dr. Amol Kolhe
Dharmaraobaba Atram : काँग्रेसचे ‘हे’ ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार, ‘बाबां’चा गौप्यस्फोट !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com