PM Modi  Sarkarnama
देश

PM Modi Speech : तेलंगणावरून मोदींचा काँग्रेसला इशारा; राजस्थान, मध्य प्रदेश छत्तीसगडमधील विजयाचे श्रेय दिले नारीशक्तीला

Sachin Fulpagare

2023 Assembly Elections Results in Marathi : पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात करताच भाजप कार्यकर्त्यांनी मोदी... मोदी... च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदींनी 'भारत माता की जय' म्हणत भाषणाला सुरुवात केली. या घोषणांचा आवाज तेलंगणापर्यंत गेला पाहिजे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामध्ये विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला इशारा दिला आहे. आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सबका साथ, सबका विकास... या भावनेचा विजय झाला आहे. विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे. वंचितांना मिळालेल्या संधीचा विजय आहे. भारताच्या राष्ट्र विकासाच्या विचाराचा विजय झाला आहे. इमानदारी, पारदर्शकता आणि सुशासनचा हा विजय आहे. सर्व मतदारांचे आभार मानतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जनतेने भाजपला भरपूर स्नेह दिला आहे. तेलंगणामध्येही भाजपला समर्थन सातत्याने वाढत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ( Five State Assembly Elections Result in Marathi )

माता, भगिनी आणि मुली, तरुण, शेतकरी आणि गरिबांनी निर्णय घेत भाजपला समर्थन दिले आहे. याबद्दल मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. पण देशात माझ्यासाठी फक्त चार जाती या सर्वात मोठ्या आहेत. आपली नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरिबी कुटुंब, या चार जाती सशक्त केल्यानंतर देश सशक्त होईल, असे म्हणाले. ( PM Modi )

मोठ्या संख्येत आपले ओबीसी साहकारी या वर्गातून येतात. मोठ्या संख्येत आदिवासी सहकारी याच वर्गातून येतात. या निवडणुकीत या चारही जातींनी भाजपच्या योजना आणि भाजपच्या रोडमॅपवर मोठा विश्वास दर्शवला आहे. आज आमचा विजय झाला, असे प्रत्येक गरीब, शेतकरी, आदिवासी, तरुण म्हणतोय. या विजयात प्रत्येक महिला आपला विजय बघते आहे, असे ते म्हणाले.

आज विशेष करून देशाच्या नारीशक्तीचे अभिनंदन करेन. या निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये मी नारीशक्तीचा उल्लेख करत होतो. भाजपचा झेंड फडकवणार हे नारीशक्तीने या निवडणुकीत ठाम भूमिका घेतली होती. देशाची नारीशक्ती कुणाचे सुरक्षाकवच बनले तर कुठलीही ताकद पराभव करू शकत नाही. आज नारीशक्ती वंदन विधेयकाने देशातील माता, भगिनींमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. भाजप सरकारमध्ये आपल्या सक्रिय भागिदारीला नवी उंची मिळेल, अशी भावना देशातील प्रत्येक महिलेत निर्माण झाली आहे. भाजपच नारीची प्रतिष्ठा, सन्मान आणि नारी सुरक्षेची सर्वात मोठी गॅरंटी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या निवडणुकीत महिलांनी भाजपच्या विजयाची पूर्ण जबाबदारी आपल्या हाती घेतली होती. आणि भरपूर आशीर्वाद दिले. भाजपने दिलेली सर्व आश्वासने शतप्रतिशत पूर्ण केली जातील, हे देशातील प्रत्येक महिला, भगिनींना विनम्रतेने सांगते, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT