Sunil Kanugolu Sarkarnama
देश

Sunil Kanugolu : तेलंगणात रणनीतिकार सुनील कानुगोलूंचा काँग्रेसच्या विजयामध्ये 'हात' !

Anand Surwase

Telangana Election Result 2023 : तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर यांच्या बीआरएसचा धुव्वा उडवला आहे. काँग्रेसच्या या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत कर्नाटकनंतर, तेलंगणामध्ये सलग दुसरा विजय मिळाला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा 119 पैकी 64 जागांवर विजयाचे निशाण फडकले आहे. काँग्रेसच्या या दमदार विजयासाठी काँग्रेसच्या प्रचाराची रणनीती कारणीभूत ठरली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय निवडणूक रणनीतिकार सुनील कानुगोलू यांना जाते.

कोण आहेत सुनील कानुगोलू ?

प्रशांत किशोर यांच्यासारखेच तोडीस तोड निवडणुकीची रणनीती आखण्यात सुनील कानुगोलू यांचा हातखंडा आहे. 2022 मध्ये कर्नाटकच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना नियुक्त केले होते. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सुनील कानुगोलू यांच्या रणनीतीने आणि काँग्रेस कार्यकर्त्याच्या परिश्रमाने काँग्रेसला बहुमताने विजयी होत सत्तेत कमबॅक करता आले.

त्यानंतर सातत्याने काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असलेल्या कानुगोलू यांच्या Inclusive Minds या कंपनीला तेलंगणा निवडणुकीच्या रणनीतीचे काम देण्यात आले. सुनील कानुगोलू यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्येही आक्रमक रणनीती

मूळेच कर्नाटकातील बल्लारी येथील रहिवासी असलेले सुनील यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. तत्पूर्वी ते काही काळ चेन्नईमध्ये वास्तव्याला होते. परदेशातील शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर सुनील यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत 2014 मध्ये भाजपसाठी काही काळ काम केले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी काँग्रेससोबत कामाला सुरुवात केली.

कानुगोलू यांनी 2023 च्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला विक्रमी 135 विधानसभा जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषत: कर्नाटक निवडणूक प्रचारातील 'PayCM' आणि '40% सरकार' या टीकात्मक कॅम्पेन चालवण्यासाठी सुनील यांची रणनीती होती.

केसीआर यांच्या विरोधात उठवले रान

तेलंगणातील विजयामागेदेखील सुनील यांच्या रणनीती आणि डावपेचाचे श्रेय मानले जाते. तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देताना सुनील यांना संपूर्ण मोकळीक देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तेलंगणातील काँग्रेसची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्यावर भर दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांनी तेलंगणात केसीआर यांच्याविरोधात भ्रष्टाचार, बेरोजगारी, कालेश्वर प्रकल्प घोटाळा, आदिवासींचे प्रश्न, सर्वसामान्यांना न मिळालेल्या मुलभूत गरजा या मुद्यांवर प्रचारावर भर दिला. तसेच फार्म हाऊसवरून काम करणारे मुख्यमंत्री, कौटुंबिक राजकीय पार्टी, भ्रष्टाचार या मुद्द्यांना प्रचारात अधिक हायलाइट केले. त्यामुळे तेलंगणात केसीआर यांच्या विरोधात वातावरण तयार झाले.

सुनील यांनी ए. रेवंत यांच्या सोबत सोशल मीडिया टीमहीच्या माध्यमातून केसीआर आणि त्यांच्या पार्टीच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले याचा परिणाम काँग्रेसच्या दक्षिण दिग्विजयामध्ये तेलंगणातही विजयी पताका फडकवता आली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT