azam khan sarkarnama
देश

आझम खान कारागृहातूनच निवडणुकीच्या रिंगणात

आझम खान यांच्यावर एकूण ८७ गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन गुन्ह्यांसाठी ते सध्या सीतापूर कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. जमिन माफिया प्रकरणात सीतापूर कारागृहात (sitapur jail) शिक्षा भोगत असलेले समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (azam khan) यांनी आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता त्यांचा हा उमेदवारी अर्ज रामपूर येथे पाठविण्यात आला आहे.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूर विधानसभेचे तिकीट दिले आहे. आझम खान यांचे सुपुत्र अब्दुला आजम खान यांना स्वार विधानसभेचे तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणार उतरवलं आहे. काही दिवसापूर्वी अब्दुला यांची सीतापूर कारागृहातून जामीनावर सुटका झाली आहे. त्याचे वडील आझम खान यांच्यावर काही खटल्यांबाबत सुनावणी सुरु आहे. त्यांना अद्याप जामीन मंजुर झालेला नाही. त्यामुळे ते सीतापूर कारागृहातूनच निवडणुक प्रचार करणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

आझम खान यांच्यावर एकूण ८७ गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन गुन्ह्यांसाठी ते सध्या सीतापूर कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ते २७ फेब्रुवारी २०२० पासून कैदेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी तंजीन व मुलगा अब्दुला हे दोघेही कारागृहात होते. त्यांचा जामिन मंजूर झाल्याने ते दोघे सध्या बाहेर आहेत. आझम खान यांनी कारागृहाच्या बाहेर येऊन निवडणुक लढविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे. प्रचारासाठी कारागृहाबाहेर येण्याची मागणी आझम खान यांनी आता सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुठलीही अडचण आली नसल्याचे समाजवादी पार्टीचे नेते आसिम राजा यांनी सांगितलं. आझम खान यांना लवकर जामीन मिळावा, म्हणून आमचा प्रयत्न सुरु असल्याचे आसिम राजा यांनी माध्यमांना सांगितलं. जामीन मिळाल्यानंतर ते प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

दोन प्रस्तावांसह आजम खान यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. आझम खान यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एका निवडणुक अधिकाऱ्याने कारागृहात येऊन त्यांच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रामपूर येथे पाठविण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT