Sanjay Raut, Jyotiraditya Shinde Sarkarnama
देश

Jyotiraditya Shinde : "बाळासाहेबांचा आदर्श लाथाडून..."; महादजी शिंदे पुरस्काराबाबत केलेल्या वक्तव्यावरून ज्योतिरादित्य शिंदेंचा राऊतांवर हल्लाबोल

Jyotiraditya Shinde on Sanjay Raut : "साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या राजकीय लोकांना साहित्य संमेलनात पुरस्कार कशासाठी? दिल्लीत दलाली करायला आला आहात का? मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार तुम्ही करता?."

Jagdish Patil

Navi Delhi News, 13 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मंगळवारी (ता.11 राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील उपस्थित होते.

मात्र, या पुरस्कार देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयोजकांसह एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. राऊतांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.

शिवसेना (Shivsena) नेत्यांसह राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवारांचे नेते राऊतांवर तोंडसुख घेत आहेत. भाजपने देखील राऊतांवर टीका केली आहे. अशातच आता महादजी शिंदे पुरस्काराबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, "मराठा समाज सर्व पाहत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श लाथाडून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करणारे लोकांना मराठा सन्मान काय समजणार? ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला जनाधार आणि सन्मान गमावला आहे ते इतरांचा सन्मान केल्यामुळे त्रस्त आहेत", अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या राजकीय लोकांना साहित्य संमेलनात पुरस्कार कशासाठी? दिल्लीत दलाली करायला आला आहात का? मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार करता तुम्ही? असं म्हणत संजय राऊतांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीका केली.

तसंच यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "ज्यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली, शिवसेना फोडली, महाविकास आघाडीचे सरकार पाडले त्या शिंदेंचा सत्कार पवारांनी करायला नको होता, हा कार्यक्रम त्यांनी टाळायला हवा होता, ही आमची भावना आहे. याबाबत कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकते. मात्र, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT