
Beed News, 13 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेते त्यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात मुंडेंनी माहिती लपवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडेंना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
राजीनामाच्या मागणी जोर धरत असतानाच न्यायालयाने बजावलेल्या आदेशामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे. तर या कारणे दाखवा नोटीसवर 24 फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी 2024 च्या परळी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे यांच्या तीन मुली तर करुणा मुंडेंच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. यावर आक्षेप घेत करुणा मुंडे यांनी परळीतील (Parli) फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने आता या तक्रारीची दखल घेत नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.