Muhammad Yunus Sarkarnama
देश

Bangladesh Election News : मोठी बातमी! बांगलादेशात होणार सार्वत्रिक निवडणूक; युनूस यांनी सांगितला अपेक्षित कालावधी

Muhammad Yunus on Bangladesh Election: जाणून घ्या, मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या निवडणुकीबाबत नेमकं काय सांगितलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Bangladesh Election Update : शेख हसीना यांची सत्ता उलथल्यानंतर बांगलादेशच्या जनतेसह अवघ्या जगाला बांगलादेशच्या नवीन सरकारसाठी होणारी सार्वत्रिक निवडणूक कधी असेल, याची प्रतीक्षा आहे. अखेर याबाबत बांगलादेशचे अंतिरम नेते मोहम्मद युनूस यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, बांगलादेश 2025च्या अखेरीस किंवा 2026च्या पहिल्या सहा महिन्यात संसदीय निवडणूक घेण्याची योजना बनवत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार निवडणुकीच्या रोडमॅपबाबत माहिती देताना युनूस(Muhammad Yunus) यांनी म्हटे की, निवडणुकीची टाईमलाइन निवडणूक सुधारणा आयोगाच्या शिफारशींवर अवलंबून आहे. परंतु 2025च्या अखेरीस निवडणुका घेणे शक्य होऊ शकते.

तसेच युनूस यांनी सांगितले की, जर राजकीय सहमतीने निर्णय घेतला की आम्हाला आणि मी पुन्हा एखदा सांगतो, करावेच लागेल. किमान सुधारणा आणि अचूक मतदार यादीसह निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हे 2025च्या अखेरपर्यंत शक्य होऊ शकते.

मोहम्मद युनूस यांनी पुढे म्हटले की, निवडणूक आयोगाला आवश्यक शिफारशी लागू करण्यास आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. त्यांनी पुढे म्हटले की, जर मतदार यादी योग्य वेळेवर तयार केली जाते तर बांगलादेशात(Bangladesh ) 2025च्या शेवटपर्यंत निवडणूक होवू शकते. त्यांनी म्हटले की, जर व्यापक सुधारणांना लक्षात घेतले तर निवडणूक 2026च्या पहिल्या सहामाही पर्यंत होवू शकते.

देशात निवडणूक घेण्यासाठी अंतरिम सरकारने आयोग गठीत केला आहे, ज्यास सहा महिन्यात आपला अहवाल मुख्य सल्लागारांकडे सादर करायचा आहे. तसेच युनूस यांनी हेही सांगितले की, यंदा हे काम जास्त आव्हानात्मक आहे. कारण, मतदारांना मागील तीन निवडणुकांपासून निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. मतदारयादीची 15 वर्षांत पडताळणी झालेली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT