Muhammad Yunus to be Chief Adviser Interim Govt in Bangladesh Sarkarnama
देश

Bangladesh Yunus government News : युनूस सरकारने मान्य केली मोठी चूक! सात हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूबाबत म्हटले की...

Bangladesh government : बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यापासून हिंदू आणि भारतीयांवर विशेषकरून जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर स्थानिकांकडून हल्ले होत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Bangladesh Yunus government admits mistake: बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यापासून हिंसचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष करून हिंदू आणि भारतीयांवर जे अल्पसंख्याक आहेत अशांवर स्थानिकांकडून हल्ले होत आहेत. यामुळे भारत आणि बांगलादेशातील संबंधामध्ये काहीसा तणाव निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

तर, या सर्व वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या बांगलादेशमधील विद्ममान मोहम्मद युनूस(Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने आपली एक मोठी चूक मान्य केली आहे आणि त्याची जबाबदारीही घेतली आहे.

रस्ते वाहतूक आणि पूल मंत्रालयाचे सल्लागार मुहम्मद फौजुल कबीर खान यांनी शनिवारी (११ जानेवारी २०२५) सांगितले की, गेल्या वर्षी रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी अंतरिम सरकार घेते.

द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्यांनी बांगलादेश(Bangladesh ) रस्ते वाहतूक प्राधिकरण (बीआरटीए)च्या मुख्यालयात या संबंधी झालेल्या दोन बैठकानंतर पत्रकारांना सांगितले की, मंत्रालय आपली जबाबदारी घेत रस्ते अपघात आणि मृत्यूंवर अंकुश लावण्यासाठी अनेक उपाययोजना करणार आहे.

सल्लागार म्हणाले की, रोड सेफ्टी फाउंडेशनने अलीकडेच त्यांना दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी रस्ते अपघतांमध्ये 7 हजार 294 लोक मारले गेले आणि 12 हजारांहून अधिक जखमी झाले. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही अंतरिम सरकार याची जबाबदारी घेत आहोत. आम्ही जबाबदारी घेत आहोत की रस्ते दुर्घटना आणि मृत्यूंची संख्या कमी करू शकलो नाहीत. उलट यामध्ये वाढच झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT