Chief Election Commissioner Election : ... म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची परंपरा खंडीत होणार?

Chief Election Commissioner Selection Process : पहिल्यांदाच बदललेल्या नियमांनुसार नवीन निवडणूक आयुक्तांची होणार नियुक्ती
Rajiv kumar
Rajiv kumarsarkarnama
Published on
Updated on

Chief Election Commissioner Rajiv Kumar Retirement News : दिल्लीत निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. याचदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निवृत्तीची तारीखही जवळ येत आहे. दिल्लीत निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काही दिवसातच मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या पदावरून निवृत्त होतील. रिपोर्टनुसार राजीव कुमार यांचा 18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असेल.

राजीव कुमार(Rajeev Kumar) यांच्यानंतर पहिल्यांदाच नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती बदललेल्या नियमांनुसार होईल. याआधी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश देखील असायचे मात्र नव्या कायद्यात सीजीआय यांना पॅनलच्या बाहेर ठेवलं गेलं.

कशी होणा मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड? -

परंपरागत पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्तांचे उत्तराधिकारी पुढील सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त असतात. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023नुसार पहिल्यांदा, याची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. निवडणूक आयोगात सद्यस्थितीस मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त - ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांचा समावेश आहे.

Rajiv kumar
Delhi Election 2025 : केजरीवालांना घेरण्यासाठी भाजपने आखली रणनीती ; उचलणार 'हे' पाऊल

अशावेळी ज्ञानेश्वर कुमार देखील दावेदारीत असू शकतात. परंतु अधिनियमाच्या कलम 6 आणि 7 नुसार, विधीमंत्रालय निवड समितीसाठी पाच नावांचे पॅनल तयार करण्यासाठी विधि मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका शोध समिती स्थापन करेन.

निवड समितीमध्ये पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे. ही समिती नवीन वरिष्ठ निवडणूक आयुक्त किंवा बाहेरील कुणी अन्य व्यक्तिच्या नावाचा विचार करू शकते. कायद्याच्या कलम 6 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची ही प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

Rajiv kumar
PM Modi At France : पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये फ्रान्स दौऱ्यावर; AI शिखर परिषदेत होणार सहभागी

भलेही ज्ञानेश कुमार उच्च पदासाठी संभाव्य उमेदवार बनले आहेत. परंतु अधिनियम निवड समितीला निवडणूक आयोगाच्या बाहेरील नावांचा विचार करण्याचा पर्याय देतो. हे निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत सुधारणेपासून ईव्हीएम(EVM)च्या कार्यक्षमतेच्या अनेक मुद्य्यांवर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com