Bansuri Swaraj Challenge Kejriwal Sarkarnama
देश

Bansuri Swaraj Challenge Kejriwal : बांसुरी स्वराज यांचं अरविंद केजरीवालांना 'ओपन चॅलेंज', म्हणाल्या...

Bansuri Swaraj Vs Arvind Kejriwal : 'पुजारी- ग्रंथी सन्मान' योजनेच्या घोषणेवरही केली आहे टीका; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाल्या आहेत?

Mayur Ratnaparkhe

BJP MP Bansuri Swaraj News : भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याकडून घोषित करण्यात आलेल्या 'पुजारी- ग्रंथी सन्मान' योजनेच्या घोषणेवर टीका केली आणि हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तुष्टिकरण' चाल असल्याचे म्हटले आहे.

एका पत्रकारपरिषदेत बोलताना खासदार बांसुरी स्वराज( Bansuri Swaraj) यांनी केजरीवालांना महिला सन्मान योजनेसह त्यांच्याकडून घोषित करण्यात आलेल्या योजना लागू करून दाखवण्याचे खुलं आव्हान दिलं आणि हेही सांगितलं की, सध्या कोणतीच आदर्श आचारसंहिता लागू नाही.

केजरीवालांनी(Arvind Kejriwal) सोमवारी फेब्रुवारीत आम आदमी पार्टी सत्तेत आल्यानंतर सर्व हिंदू मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथींना मासिक 18000 रुपये मानधन देणार असल्याची घोषणा केली होती. तर यावर बोलताना बांसुरी स्वराज यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी सरकारकडे निधीचा तुटवडा असल्या कारणाने अनेक महिन्यांपासून मशिदींच्या इमामांना त्यांचे 18000 रुपये दिले गेलेले नाहीत आणि तरीही केजरीवाल निवडणुकीच्या तोंडावर पुजारी आणि ग्रंथींना खूश करण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न करत आहेत.

याशिवाय बांसुरी स्वराज यांनी प्रश्नही उपस्थित केला की, मागील दहा वर्षांमध्ये पुजारी आणि ग्रंथींना कोणतेही मानधन का दिले गेले नाही?, आता निवडणुकीच्या तोंडावर ते मानधन देणार असल्याचे कपटीपणे आश्वासन देत आहेत.

या आधी भाजप(BJP) प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी या योजनेवरून आम आदमी पार्टीवर निशाणा साधत म्हटले होते की, त्यांनी(आप) इमामांचे मानधन दिलेले नाही. असं कुणीच उरलेलं नाही, ज्याला आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालांनी फसवलेलं नाही. आरटीआयच्या माध्यमातून समजलं आहे की, आम आदमी पार्टी सरकारने घोषणा केली होती की, मौलवी आणि इमाम यांना वेतन भत्ता दिला जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT