Impact of Seat Distribution on NDA’s Bihar Campaign : भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आघाड्यांमधील जागावाटपाचा पेच सोडविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. मात्र, एनडीएसह इंडिया आघाडीलाही अद्याप त्या यश आलेले नाही. देशात सत्तेत असलेल्या भाजपला दोन केंद्रीय मंत्र्यांनी नाकीनऊ आणले आहे. त्यांच्या ‘डिमांड’ पूर्ण करण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे.
एनडीएच्या जागावाटापाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अजूनही वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. जागावाटपाची अधिकृतपणे घोषणा झाल्याखेरीज नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचे कोडे उलगडणार नाही. एनडीएमध्ये भाजपसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती आणि केंदीय मंत्री जीनतराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवामी मोर्चा या पक्षांचा समावेश आहे.
पासवान आणि मांझी हे अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी अडून बसल्याचे समजते. भाजप व जेडीयू हे दोन्ही पक्ष प्रत्येकी शंभरहून अधिक जागा लढविण्यावर ठाम आहे. इतर मित्रपक्षांना 40 जागा मिळू शकतात. त्यावरच चर्चाच्या फेऱ्या सुरू आहेत. मांझी यांच्याकडून 10 ते 15 जागांची मागणी केली जात आहे. मात्र, भाजप त्यासाठी तयार नाही. तर पासवान यांच्याकडूनही 30 हून अधिक जागांची मागणी आहे.
दोन्ही केंद्रीय मंत्र्यांकडून जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपला निर्वाणीचा इशारा दिला जात आहे. दबाव वाढवून हव्या तेवढ्या जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, भाजपकडूनही त्यांना अपेक्षित दाद दिली जात नाही. पासवान यांना 27 ते 28 आणि मांझी यांना जेमतेम सहा जागांवर राजी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर तिसरे भिडू उमेंद्र कुशवाह यांनाही तेवढ्याच जागा मिळू शकतात.
भाजप आणि जेडीयू हे प्रत्येक 101-102 जागा लढू शकतात. दोघांमध्ये कुणीही मोठा भाऊ नसेल, याची खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत जेडीयूला भाजपपेक्षा निम्म्या जागा जिंकता आल्या होत्या. पण त्यानंतरही भाजपकडून नितीश कुमार यांच्या पक्षाला झुकते माप दिले जात आहे. बिहारमध्ये अजूनही नितीश कुमार यांची चलती असल्याचेच चित्र सध्याच्या जागावाटपावरून दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.