nitish kumar narendra modi rahul gandhi lalu prasad yadav Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : नितीश कुमारांच्या पलटीचा 'एनडीए'ला फायदा? मोठा सर्व्हे समोर

Akshay Sabale

काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'इंडिया'शी काडीमोड करत पुन्हा एकदा भाजपप्रणित 'एनडीए'त सामील झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांनी ( Nitish Kumar ) पलटी मारल्यामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला होता. अशातच 'इंडिया टुडे'नं 'मूड ऑफ नेशन'च्या माध्यमातून देशातील नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यामध्ये भाजपप्रणित 'एनडीए'ला मोठा धक्का मिळताना दिसत आहे, तर 'इंडिया' आघाडीला जास्त जागा मिळू शकतात.

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप ( Bjp ) आणि नितीश कुमार यांच्या जनता दलाच्या ( युनायटेड ) युतीचं सरकार स्थापन झालं होतं. पण, 'इंडिया टुडे'च्या सर्व्हेत भाजपप्रणित 'एनडीए'ला 17 जागांवर नुकसान होताना दिसत आहे, तर 'इंडिया' आघाडीला ( India Alliance ) 7 जागा अधिक मिळू शकतात. 'इंडिया' आघाडी आणि 'एनडीए'च्या मतांच्या टक्केवारीत वाढ होताना दिसत आहे, पण लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीच्या जागा वाढू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. सर्व्हेनुसार 'एनडीए'ला 51.5 टक्के आणि 'इंडिया' आघाडीला 38 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 'एनडीए'ला 32 आणि 'इंडिया' आघाडी 8 जागांवर निवडणूक जिंकू शकते. 2019 मध्ये विरोधकांना बिहारमध्ये एकच जागा मिळाली होती. काँग्रेसचा एक उमेदवार लोकसभेला निवडून आला होता, पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीला आठ जागा मिळू शकतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे. त्यामुळे विरोधकांना 7 जागांचा फायदा होताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला 17, नितीश कुमारांच्या जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षाला ( एलजेपी ) मिळून 15, काँग्रेसला 1, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल ( आरजेडी ) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ( माकप ) 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 'एनडीए'ला 32 आणि 'इंडिया' आघाडीला 8 जागा मिळू शकतात.

2019 मध्ये 'एनडीए'ला 39 जागा

बिहार लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये 'एनडीए'नं 39 जागांसह 35.4 टक्के मते मिळवली होती. 'यूपीए' आघाडीला एका जागेसह 28.3 टक्के मिळाली होती, तर भाजपला 17, 'जेडीयू'ला 16, 'एलजेपी'नं 6 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसनं किशनगंज येथील जागा जिंकली होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT