Loksabha Election 2024 Survey : तेलंगणात KCR यांना मोठा धक्का, तर आंध्रात नायडूंची आघाडी; दोन रेड्डींचं काय?

Loksabha Election 2024 : 'इंडिया टुडे'नं 'मूड ऑफ नेशन'अंतर्गत देशातील जनतेची मते जाणून घेतली आहेत.
jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao Sarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा हॅट्ट्रिक करणार की इंडिया आघाडी सत्ताधाऱ्यांचा विजयरथ रोखणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच 'इंडिया टुडे'नं 'मूड ऑफ नेशन'अंतर्गत देशातील जनतेची मते जाणून घेतली आहेत. या सर्व्हेत दक्षिणेतील आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्ष ( टीडीपी ) आणि तेलंगणात काँग्रेसला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. तर, आंध्र प्रदेशात यंदाही भाजपा खातं उघडणार नसल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे.

jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
Loksabha Election 2024 : मोठी बातमी : भाजपच्या 'मिशन 45'ला सुरुंग; निवडणूकपूर्व सर्वेक्षणात महायुतीला महाधक्का

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. 2019 साली मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ( Jaganmohan Reddy ) यांच्या 'वायएसआर' काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर विजय मिळवला होता. तर, माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या 'टीडीपी' पक्षाला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्रात भाजप आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता आंध्र प्रदेशात मतदान झालं तर लोकसभेला 25 पैकी 17 जागा चंद्रबाबू नायडू यांच्या 'टीडीपी' पक्षाला मिळू शकतात. जगनमोहन रेड्डींच्या 'वायएसरआर' काँग्रेसला 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, यंदाही भाजप आणि काँग्रेसला खातं उघडता येणार नाही.

jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
White Paper News : आधी मनमोहन सिंग यांचं कौतुक अन् काही तासांतच कामगिरीची चिरफाड; संसदेत दोन दिवस ठरणार वादळी

तेलंगणात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला 21.1 टक्के, काँग्रेसला 41.2 आणि भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) 29.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांबाबत बोलायचं झालं, तर एका जागेच्या नुकसानासह भाजपचे तीन खासदार निवडून येऊ शकतात. 2019 मध्ये काँग्रेसला 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण, यंदा काँग्रेसला 10 जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेलंगणात थेट 7 जागांचा फायदा काँग्रेसला होणार आहे.

jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
Harda Factory Blast News : आमदाराने गळ्यात सुतळी बॉम्बचा हार घातला अन् विधानसभेत...

त्यासह देशात 'बीआरएस' पक्षाचा विस्तार करण्याचं ध्येय बाळगलेल्या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना स्व:राज्यात मोठा धक्का बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत 'बीआरएस'ला 3 आणि 'एमआयएम'ला 1 जागा मिळू शकते.

jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
ED Action In Jharkhand : काँग्रेस खासदाराने दिली हेमंत सोरेन यांना BMW कार भेट? ईडीने बजावलं समन्स!

तेलंगणात लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपला 4, काँग्रेसला 3, 'बीआरएस'ला 9 आणि 'एमआयएम'ला 1 जागा मिळाली होती.

jagan mohan reddy, chandrababu naidu, revanth reddy, K. Chandrashekar Rao
Rahul Gandhi News : ओबीसी नव्हे, 'या' जातीत जन्मले! राहुल गांधी घसरले मोदींच्या जातीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com