Bilawal Bhutto during a press interaction where he acknowledged Pakistan’s past involvement in supporting terrorism, stirring global political reactions.  sarkarnama
देश

Bilawal Bhutto : कबूल है....! पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यानंतर आता बिलावल भुट्टोंचाही मोठा कबुलनामा

Bilawal Bhutto’s Shocking Admission on Terrorism : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे.

Mayur Ratnaparkhe

Bilawal Bhutto admits Pakistan backed terrorism : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी कबूल केलं आहे की, त्यांच्या देशाचा भूतकाळ दहशतवादी संघटनांना समर्थन देण्याचा राहिलेला आहे. भुट्टो यांच्या टिप्पणीच्या काही दिवस आधीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांना म्हटले होते की, पाकिस्तान अनेक दशके दहशतवादास मदत करण्याचे घाणेरडे काम करत राहिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार भुट्टो यांनी १ मे रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, जसं की संरक्षणमंत्री आसिफ म्हणाले आहेत, तसं मला नाही वाटत की हे काही गुपित आहे की पाकिस्तानचा तो भूतकाळ आहे.

भुट्टो यांनी आधी अफगान युद्धात मुजाहिदीनला आर्थिक मदत करणे आणि पाठिंबा देण्यात पाकिस्तानच्या सक्रिय भूमिकेकडेही लक्ष वेधले. त्यांनी म्हटले की, आम्ही हे पाश्चात्य शक्तींशी समन्वय आणि सहकार्यातून केले. पाकिस्तान दहशतवादाच्या एकामागून एक लाटांमधून गेला... आम्ही त्रास सहन केला.

बिलावल भुट्टो झरदारी पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आहेत, जे पाकिस्तानच्य सत्तारूढ पार्टीचा भाग आहेत. मात्र भुट्टो यांनी जोर देत हेही म्हटले की, गेल्य काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे.

बिलावल भुट्टो यांनी म्हटले की, हे खरंय दहशतवाद आमच्या इतिहासाचा दुर्दैवी भाग आहे. परंतु आम्ही यातून धडाही घेतला आहे. तसेच त्यांनी बदलत्या परिस्थितीसाठी अंतर्गत सुधारणा आणि लष्करी कारवायास श्रेय दिले आहे, विशेष करून त्यांची आई बेनजीर भुट्टो यांच्या हत्येनंतर, दहशतवादाबाबत धोरण बदलले आहे. तसेच बिलावल भुट्टो यांनी म्हटले की, आम्ही प्रत्येक दुसऱ्या दिवशी दहशतवादी बघितले. पाकिस्तानने या समूहाविरोधात गंभीर आणि यशस्वी कारवाई केली.

विशेष म्हणजे या आधी मागील आठवड्यातच एका वृत्तसंस्थेला दिलेल्य मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांना विचारले गेले होते की, पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना समर्थन, प्रशिक्षण आणि फंडिंग देण्याचा मोठा इतिहास राहिला आहे का? यावर त्यांनी स्पष्टपणे मान्य करत सांगितले की असंच आहे. परंतु त्यांनी याचा दोष पाश्चिमात्य राष्ट्रांवर टाकण्याचा प्रयत्न केला.

आसिफ यांनी सांगितले होते की, आम्ही जवळपास तीन दशकांपासून अमेरिका आणि ब्रिटनसह पाश्चिमात्य  देशांसाठी हे घाणेरडे काम करत राहिलो. ही एक चूक होती आणि आम्हाला याची किंमत चूकवावी लागली, त्यामुळे तुम्ही मला हे विचारत आहात. जर आम्ही सोव्हियत युनियनविरोधातील युद्धात आणि 9/11 नंतर युद्धात सहभागी झालो नसतो, तर पाकिस्तानाच ट्रॅक रेकॉर्ड निष्कलंक असता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT