BJP  Sarkarnama
देश

BJP action on rebel leaders : बिहारमधील विजयोत्सवात भाजपकडून बंडखोरांवर कारवाई; काहीचं निलंबन, तर काहींना बजावल्या नोटीसा

BJP Takes Action on Rebel Leaders as Bihar Incharge Arvind Sharma Issues Notices : बिहारमधील विजयानंतर भाजपने बंडखोरांवर कारवाईला सुरूवात करत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

Pradeep Pendhare

Bihar BJP internal conflict : बिहारमधील निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने लगेचच बंडखोर नेत्यांवर कारवाईला सुरवात केली आहे. यात, केंद्रातील माजी मंत्री आणि बिहारमधील नेते आर. के. सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

यासोबतच विधानपरिषदेचे आमदार अशोक अग्रवाल यांनाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईनंतर आर. के. सिंह यांनी लगेचच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

केंद्रात गृहसचिव तसेच ऊर्जामंत्री राहिलेले सिंह हे लोकसभा निवडणुकीमध्ये आरा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर नाराज होते. बिहार (Bihar) सरकार तसेच केंद्र सरकावरही ते सातत्याने टीका करत होते. बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आर. के. सिंह यांनी आरोपांची राळ उडवून दिली होती.

‘नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारने भागलपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्प अदानी पॉवरला देऊन राज्याच्या तिजोरीचे 62 हजार कोटी रुपयांचे नुकसान केले आहे,’ या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनाही सिंह यांनी लक्ष्य केले होते. पक्षाकडून यावर नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.

स्पष्टीकरणासाठी आठवड्याची मुदत

बिहार भाजपचे राज्य मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी आर. के. सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षातून काढून का टाकू नये? याचे स्पष्टीकरण एका आठवड्याच्या आत द्यावे, असे त्यात म्हटले होते. आमदार अग्रवाल, कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. निलंबन ही केवळ एक प्रक्रिया असून नंतर हकालपट्टी केली जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारस्थापनेच्या हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह संयुक्त जनता दलाच्या (JDU) महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रविवारी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान, ‘एनडीए’च्या घटक पक्षांच्या आमदारांची 18 व 19 नोव्हेंबरला बैठक होणार असून, त्यानंतर विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर म्हणजे 21 किंवा 22 नोव्हेंबर रोजी शपथविधी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT