BJP seats in RajyaSabha Sarkarnama
देश

BJP Politics In Odisha : ओडिशामध्ये सुरू झाला 'खेला'? ; भाजपचा नवा गड राज्यसभेत सेट करणार नंबर गेम!

BJP seats in RajyaSabha : ...म्हणून भाजप राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे जुळवण्यासाठी ओडिशाच्या रुपाने आपल्या नव्या प्रादेशिक बालेकिल्ल्याचा वापर करू शकतो.

Mayur Ratnaparkhe

BJP and Rajya Sabha Numbers Game : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमध्येही भलेही घसरण झालेली असेल, मात्र ओडिशाच्या रुपात पक्षाला नवा गड नक्कीच मिळाला आहे. भाजपने ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीत केवळ विरोधकांचा सुपडा साफच केला नाहीतर, विधानसभेवरही पहिल्यांदाच झेंडा फडकवत सत्ता मिळवली. आता भाजप राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे जुळवण्यासाठी ओडिशाच्या रुपाने आपल्या नव्या प्रादेशिक बालेकिल्ल्याचा वापर करू शकते किंवा करते आहे.

BJD नेत्या ममता मोहंता यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ममता मोहंता यांच्या राजीनाम्यास सभापतींनी तत्काळ मंजूरी दिली. ममता यांच्या या निर्णयाकडे भाजपची राजकीय खेळी म्हणून बघितले जात आहे. मोहंता 2020मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता. परंतु त्यांनी दोन वर्ष आधीच राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचा थेट भाजपला फायदा होणार आहे.

ममता मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होईल. तर विधानसभेतील सदस्य संख्येच्या गणितानुसार ही जागा भाजपच्या हातात जाईल. ओडिशा(odisha)मधून एकूण दहा राज्यसभा खासदार आहेत. राज्याची सत्ता भलेही भाजपच्या ताब्यात असेल, मात्र ओडिशामधून भाजपच्या खात्यात आता केवळ एकच राज्यसभा खासदार आहे, उर्वरीत जागांवर बीजू जनता दलाच्या नेत्यांचा ताबा आहे. मात्र आता जी निवडणूक होईल त्यात संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून अनेक खासदरांना ओडिशामधून राज्यसभेवर पाठवले जावू शकते.

अशावेळी ममता मोहंता यांच्या राजीनाम्याकडे भाजपची राजकीय खेळी म्हणून बघितले जात आहे. असाही अंदाज वर्तवला जात आहे की त्या आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की अखेर या 'खेला' मागचं कारण काय असू शकते? खरंतर भाजपने(BJP) लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा स्वबळावर न ओलांडता आल्याने एनडीएच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. आता लोकसभेत तर बहुमत मिळालं आहे, पण राज्यसभेत जागांच्या आधारावर अडचण होत आहे.

राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या 245 आहे, मात्र विद्यमान खासदारांची संख्या 225 आहे. मग यानुसार राज्यभेतील बहुमताचा आकडा 113 होतो. आता पक्षांचा जर विचार केला तर भाजपकडे एकूण 86 राज्यसभा खासदार आहेत. एनडीए घटक पक्षांना मिळून ही संख्या 101 आहे. म्हणजे भाजप राज्यसभेतील बहुमताच्या संख्येपासून बरीच मागे आहे. मग अशावेळी जर भाजपला राज्यसभेत आपली ताकद वाढवायची असेल, तर ओडिशामधून मिळणाऱ्या जागा अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत बोलायचं झालं तर, त्यांच्याकडे राज्यसभेच्या एकूण 87 जागा आहेत. यामध्ये काँग्रेस 26, तृणमूल काँग्रेस 13 जागा, आम आदमी पार्टी आणि डीएमकेच्या प्रत्येकी दहा जागा आहेत. बाकी उर्वरीत जागा मित्रपक्षांच्या आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या जागांव्यतिरिक्त ज्या जागा आहेत, त्या जे अपक्ष आहेत अशा पक्षांकडे आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT