Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : भाजप नेत्याची राहुल गांधींवर टीका; केली ओसामा बिन लादेनशी तुलना

BJP Attack on Rahul Gandhi : नितीश कुमारांची मानसिक स्थिती बिघडली

सरकारनामा ब्यूरो

BJP Leader Compare Rahul to Osama Bin Laden : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाढी वाढवली होती. त्यांच्या बदलेल्या लुकवरून भाजप नेत्यांनी राहुल यांना लक्ष्य केले होते. कुणी दाढी वाढवून पंतप्रधान होत नाही, अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली होती. दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्री गांधी यांना सद्दाम हुसेन म्हटले होते. आता भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधी यांच्यावर कडवी टीका केली आहे. यामुळे देशात नवीन वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

बिहार भाजपचे प्रमुख सम्राट चौधरी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना अल-कायदाचा मारला गेलेला प्रमुख ओसामा बिन लादेनशी तुलना केली. सम्राट चौधरी म्हणाले, "केवळ दाढी वाढवून कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी ओसामा बिन लादेनसारखी दाढी ठेवतात आणि त्यांना वाटते की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे बनतील."

सध्या राहुल गांधी यांनी दाढी कमी केली आहे. मात्र भारत जोडो यात्रेतील त्यांच्या दाढीवरून सम्राट यांनी त्यांना लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी मुस्लीम लीग पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचे म्हटले होते. त्यावरूनही भाजपने (BJP) गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता सम्राट यांनी राहुल गांधीची थेट ओसामा बीन लादेनशी तुलना केली. यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांची मानसिक स्थिती ठीक नाही अशी टीका सम्राट यांनी केली. ते म्हणाले, "नितीश कुमार देशभर फिरत आहेत. सर्वांना सांगत आहेत की ते देशाचे पंतप्रधान आहेत. नितीश कुमार पंतप्रधान आहेत का? नितीशजींची मानसिक स्थिती ठीक नाही. 'गजनी' चित्रपटाच्या नायकाची आठवण मधेच अशीच जाते. आजकाल मुख्यमंत्र्यांचीही अवस्था तशीच झाली आहे."

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधी यांच्या दाढीवरून वादग्रस्त टिप्पणी केली होती. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले होते, की "दाढी वाढल्याने राहुल गांधी यांचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा दिसू लागला आहे. पण दाढी काढली तर ते नेहरूंसारखे दिसतात."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT