Sushma Andhare: फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं तर मग शिंदेंना का केलं?; सुषमा अंधारेंनी ठेवलं मुद्यांवर बोट

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टिकेला सुषमा अंधारे यांचे प्रतिउत्तर
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Political News: केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केलं. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी अमित शाह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. "उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं की, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, मात्र, उद्धव ठाकरे यांनी दिलेलं वाचन मोडलं ", असं शाह म्हणाले. शाह यांच्या या गौप्यस्फोटावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

Sushma Andhare
Amit Shah News: भाजपने रणशिंग फुंकलं; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प, शाहांची मोठी घोषणा

"देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायची भाजपाची इच्छा होती, तर मग फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी भाजपने का बसवले? भाजपाची अशी कोणती मजबुरी होती?", असा सवाल सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

Sushma Andhare
Amit Shah on Thackeray: अमित शाह उद्धव ठाकरेंवर पुन्हा बरसले; 'या' मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आव्हान

काय आहे सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट?

"आज नांदेडमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे ठरले होते, आणि तीच आमची इच्छा होती. जर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायची भाजपाची इच्छा होती, तर मग फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी भाजपने का बसवले?"

"भाजपाची अशी कोणती मजबुरी होती? की, ज्यामुळे भाजपाने फडणवीसांचे सगळे कष्ट (?) विसरून शिंदेंना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी पाचारण केले. भाजपाने फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले याचाच अर्थ असा की, भाजपाचा फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यापेक्षा सुद्धा शिवसेना संपवणे हाच छुपा मनसुबा होता..!!", असं सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com