Shehzad Poonawala on Arvind Kejriwal Sarkarnama
देश

BJP on Arvind Kejriwal : 'लालू-राबडी मॉडेलनुसार अरविंद केजरीवालांना पत्नीला बनवायचंय मुख्यमंत्री' ; भाजपचा निशाणा!

BJP Vs AAP Politics : जाणून घ्या, भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केजरीवालांच्या निर्णयावर आणखी काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Shehzad Poonawala on Arvind Kejriwal Resignation announcement : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जसं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे जाहीर केले.

यावर आता भाजपाने निशाणा साधला आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी आरोप केला की, अरविंद केजरीवाल त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत.

शहजाद पूनावाला(Shehzad Poonawala) असंही म्हणाले की, माझ्या सूक्षत्रांनी मला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. जेणेकरून ते आपल्या आमदारांना सुनीता केजरीवाल यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यासाठी भाग पाडू शकतील. तसेच पूनावाला यांनी एक्सवर लिहिले की, लालू-राबडी मॉडल, सोनिया-मनमोहन मॉडल नुसार संपूर्ण सत्ता हवी, परंतु कोणासही उत्तर देण्यास बांधील नकोय. त्यांनी म्हटले की, माझ्या ट्वीटनंतर आम आदमी पार्टी मागे हटण्याची शक्यता आहे.

याशिवाय भाजप(BJP) नेत्याने म्हटले की, अरविंद केजरीवाल यांनी संकटात संधी शोधण्यात पीएचडी केली आहे. ते राजीनाम्याचं नाटक यासाठी करत आहे, कारण न्यायालयाने त्यांना अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्त केलेलं नाही. तर त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. ज्यामुळे ते मुख्यमंत्र्यावरून नाममात्र मंत्री बनले आहेत.

केजरीवाल काय म्हणाले आहेत? -

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) म्हणाले, "मी आता जनतेच्या न्यायालताय आलो आहे. तुम्ही मला गुन्हेगार मानता की इमानदार? आता मी दोन दिवसात मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देत आहे. मी प्रत्येक घराघरात आणि गल्लीबोळात जाईन, जोपर्यंत जनतेचा निकाल येत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही."

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT