New Dehli News : भारताचे कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. याबाबत याचिकाही दाखल केली होती. यामध्ये भारताच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. या याचिकेवर आता निर्णय झाला आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाने ब्रिजभूषण सिंग यांना मोठा झटका दिला आहे. भारताच्या कुस्तीपटूंनी मोठी लढाई जिंकली आहे.
कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद ब्रिजभूषण यांनी सोडले आणि त्यानंतर अस्थायी समितीची स्थापना केली होती. त्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संजय सिंग जिंकले होते. पण आता दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिजभूषण यांना धक्का देताना या निवडणुकीचा निकाल रद्दपातल ठरवला आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह काही जणांनी माजी खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन केले होते. या आरोपांनंतर त्यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या संजय सिंग यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. (Brijbhushan Singh News)
या निवडणुकीत संजय सिंग हे विजयी झाले होते. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्या जवळची व्यक्तीच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाली होती. त्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी अखेर निकाल देण्यात आला.
त्यामुळे येत्या काळात आता संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर कायम राहता येणार नाही. त्यामुळे ब्रिजभूषण यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संजय सिंग(Sanjay Singh) यांची कार्यकारिणी आता विघटीत केली जाणार आहे. कारण डिसेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्या रद्द ठरवण्यात येत आहेत. त्यामुळे आता अस्थायी समिती भारतीय कुस्तीबाबतचे यापुढील निर्णय घेईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे हा भारताच्या कुस्तीपटूंचा विजय असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.