Bhngvant Maan, seerat kour Sarkarnama
देश

Political News: 'भावाला घरातून हाकलले...'; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप

Sachin Waghmare

Political News :पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिच्या भावाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्यासोबतच गर्भवती पत्नीचा छळ करीत असल्याचा गंभीर आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची कन्या सीरत कौर हिने केला आहेत. मला आणि भावाला रात्रीच्या वेळी घरातून बाहेर काढले, असा आरोप तिने केला आहे.

याबाबतचा सीरत कौर यांचा व्हिडिओ शिरोमणी अकाली दलाचे (Aakali Dal) नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दाखवला, यामुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री मान यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सीरत कौरने म्हटले आहे की, तिच्या वडिलांनी पत्नी डॉ. गुरप्रीत कौर यांनी तिला आणि तिच्या भावाला बाजूला केले आहे. डॉ. गुरप्रीत कौर गर्भवती आहेत. या दोघांचा छळ करीत असल्याचा आरोप तिने केला आहे.

एखादी व्यक्ती आई-वडिलांची जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर त्यांना पंजाब चालवण्याची जबाबदारी कशी सोपवली जाऊ शकते? असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून सीरतने विचारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यासोबतच माझे वडील दारू पिऊन गुरुद्वारात जातात. ते आता तिसऱ्या अपत्याचे बाप होणार आहेत. दोन लहान मुलं सोडून गेलेल्या व्यक्तीने तिसऱ्या मुलाला जन्म का द्यावा ?, असा सवाल उपस्थित करीत तिने स्वतःला तिच्या वडिलांच्या नावापासून दूर केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

या व्हिडिओतून मुख्यमंत्री मान यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात असले तरी त्याबाबत मुख्यमंत्री मान यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर दुसरीकडे आम आदमी पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया दिली जात नाही. हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे सांगत बोलणे टाळले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT