AAP Government : दिल्लीच्या मंत्रिमंडळात फेरबदल; आतिशी यांचे वर्चस्व, सर्वाधिक १३ खाती

Atishi : आतिशी या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू सहकारी मानल्या जातात.
Atishi, CM Arvind Kejriwal
Atishi, CM Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Cabinet : दिल्लीतील केजरीवाल सरकारने मंत्र्यांकडील खात्यांमध्ये फेरबदल केला आहे. विधी व न्याय विभागाकडे अनेक महत्त्वाच्या फायली प्रलंबित असल्याने उपराज्यपाल कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर हा फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार कैलाश गेहलोत यांच्याकडून विधी खाते काढून घेण्यात आले आहे. हे खाते आता आतिशी यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडे सर्वाधिक १३ खाती आहेत. त्यामुळे सध्या दिल्लीच्या मंत्रिमंडळात आतिशी यांचे वर्चस्त दिसत आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारी विधी मंत्रालय आतिशी यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव उपराज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या नोटिफिकेशननुसार, गेहलोत यांच्याकडील विधी व न्याय खाते आतिशी यांच्याकडे देण्यात आले आहे, तर गेहलोत हे आता महिला व बालविकास खात्याचे मंत्री असतील.

Atishi, CM Arvind Kejriwal
IT Raid : बँकेचे नव्हे, हे आहे खासदाराचे लॉकर; पैसे मोजण्यासाठी तीन डझन मशीन, ५० हून अधिक कर्मचारी...

मंत्रिमंडळात आतिशी यांचे वर्चस्व

आतिशी या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू सरकारी मानल्या जातात. त्यांच्याकडे विधी खाते आल्याने आता त्यांच्याकडून एकूण विभागांची संख्या १३ वर पोहाेचली आहे. त्या केजरीवाल सरकारमधील सर्वाधिक खाती असलेल्या मंत्री आहेत. ऑक्टोबर महिन्यातच त्यांच्याकडे जल विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महसूल, नियोजन आणि अर्थ हे महत्त्वाची खातीही आतिशी यांच्याकडेच आहे. जून महिन्यातच हा फेरबदल करण्यात आला होता. हे सर्व विभाग पूर्वी गेहलोत यांच्याकडेच होते. आता त्यांच्याकडे वाहतूक, गृह, प्रशासकीय सुधारणा, महिला व बाल विकास आणि माहिती तंत्रज्ञान विभाग असतील.

(Edited By - Rajanand More)

Atishi, CM Arvind Kejriwal
Telangana Assembly : ओवेसींची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती; भाजपचे आमदार खवळले, घेतला मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com