Bharat Shetty-Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे म्हणणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

Vijaykumar Dudhale

Bangalore, 11 July : ‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थप्पड मारली पाहिजे’ असे वादग्रस्त विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार भरत शेट्टी यांच्यावर मंगळूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंगळूरमधील काँग्रेसचे (Congress) नगरसेवक के. अनिल यांच्या तक्रारीवरून मंगळूर शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मंगळूर शहर पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांचे नाव घेऊन भाजप आमदार भरत शेट्टी (MLA Bharat Shetty) यांनी प्रक्षोभक विधान केले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असेही आयुक्त अग्रवाल यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील सुरतकल येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात मंगळूर शहर उत्तरचे भाजप आमदार भरत शेट्टी यांनी ‘राहुल गांधी यांना संसदेत अटक करून थप्पड मारली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना हिंदूबाबत केलेल्या विधानाची त्या मागे पार्श्वभूमी होती. त्या मुद्याला धरून शेट्टी यांनी राहुल गांधी यांना थप्पड मारली पाहिजे, असे विधान केले आहे.

आमदार भरत शेट्टी यांचे ते विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार भरत शेट्टी यांच्यावर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मंजुनाथ भंडारी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, भरत शेट्टी हे संसदेत कसे जाणार आहेत. शेट्टी हे दहशतवादी आहेत का? शेट्टी हे काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलू शकणार नाहीत. ते राहुल गांधी यांचा काय सामना करणार, असा सवालही भंडारी यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT