Bihar News : बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. मोठ्या वादानंतर अखेर ही जनगणना जाहीर करण्यात आली आहे, याची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार राज्यात अतिमागासवर्गीयांची लोकसंख्या 36.01 टक्के आहे, तर मागासवर्गीयांची लोकसंख्या 27.12 टक्के आहे. दोन्ही प्रवर्गांची संख्या एकत्रित पाहिल्यास अतिमागासवर्ग व मागासवर्गीयांची लोकसंख्या 63 टक्क्यांहून अधिक असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील मागासवर्गीय (OBC Politics) राजकारणाची नवी सुरुवात म्हणूनही या अहवालाकडे पाहिले जात आहे. (Lates Marathi News)
अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या 19.65 टक्के आणि अनुसूचित जमातीच्या लोकांची संख्या 1.68 टक्के आहे. एवढेच नाही तर खुल्या वर्गाची म्हणजे सवर्णांची लोकसंख्या 15 टक्के आहे. प्राप्त माहितीनुसार राज्यात जातींबद्दल आढावा घेतल्यास, यादवांची लोकसंख्या सर्वाधिक 14 टक्के आहे, तर ब्राह्मण समाजाची लोकसंख्या 3.66 टक्के आहे. सर्वेक्षणानुसार राज्यात भूमिहारांची संख्या 2.86 टक्के आहे, तर राजपूतांची लोकसंख्या 3.45 टक्के आहे.
राज्यात वैश्य समाजाच्या लोकांची संख्या सुमारे अडीच टक्के आहे, तर कुर्मी समाजाचे प्रमाण २.८७ टक्के आहे. जातनिहाय पाहिले तर सर्वाधिक लोकसंख्या 14 टक्के यादवांची आहे, जी उच्च जातींच्या एकूण संख्येपेक्षा थोडीशी कमी आहे.
बिहारमध्ये आता लोकसभा निवडणुकीशिवाय विधानसभा निवडणुकीतही ओबीसी कार्डचा वापर केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. राज्यात राजद, जेडीयू आणि काँग्रेसची महागठबंधन असून, तिन्ही पक्ष या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करू शकतात. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सातत्याने संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करत आहेत. इतकेच नाही तर अखिलेश यादवही उत्तर प्रदेशमध्ये या मागणीला पाठिंबा देत आहेत.
धार्मिक आधारावर पाहिले तर राज्यात हिंदूंची संख्या 81 टक्के आहे. याशिवाय राज्यात सुमारे 17 टक्के मुस्लिम आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना करण्यात आली. पहिली फेरी यावर्षी 7 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान पूर्ण झाली, तर दुसरा टप्पा 15 एप्रिल ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पार पडला. जातनिहाय जनगणना करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते, पण शेवटी कोर्टाने त्याला मान्यता दिली.
(Latest Marathi News)
मुस्लिम - 17.7088 टक्के
यादव - 14. 2666 टक्के
कुर्मी - 2.8785 टक्के
कुशवाह- 4.2120 टक्के
ब्राह्मण- 3.6575 टक्के
भूमिहार- 2.8683 टक्के
राजपूत- 3.4505 टक्के
मुसहर- 3.0872 टक्के
मल्लाह- 2.6086 टक्के
वैश्य – 2.3155 टक्के
कायस्थ - 0.60 टक्के
अत्यंत मागासवर्गीय 36.01 टक्के
मागासवर्गीय 27.12 टक्के
अनुसूचित जाती 19.6518 टक्के
अनुसूचित जमाती 1.6824 टक्के
सवर्ण 15.5224 टक्के
कोणत्या वर्गाची लोकसंख्या किती
मागासवर्गीय लोकसंख्या : 3 कोटी 54 लाख 63 हजार 936
अत्यंत मागासवर्गीय लोकसंख्या : 4 कोटी 70 लाख, 80 हजार 514
अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 कोटी 56 लाख 89 हजार 820
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 21 लाख 99 हजार 361
खुला (सवर्ण) लोकसंख्या : 2 कोटी 02 लाख 91 हजार 679
बिहारची एकूण लोकसंख्या
13 कोटी, 07 लाख, 25 हजार 310
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.