Chandrakant Handore SARKARNAMA
देश

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, चंद्रकांत हंडोरेंना संधी

Chandrakant Handore : राजस्थानमधून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत चंद्रकांत हंडोरे जातील, अशी चर्चा होती.

Roshan More

Mumbai : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, राजस्थानमधून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत चंद्रकांत हंडोरे जातील, अशी चर्चा असताना हंडोरे यांना उमेदवारी घोषित करत काँग्रेसने विरोधकांना धक्का दिला आहे. (Rajya Sabha Election 2024 )

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा आहेत. भाजप स्वबळावर तीन जागा जिंकणार हे निश्चित मात्र, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये गेल्याने चौथी जागा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. चव्हाण यांच्यासोबत मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), अस्लम शेख जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र,काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी इतर आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता फेटाळली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हंडोरे हे काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होती. 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हंडोरे यांच्या पराभवानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी देखील समोर आली होती. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती.

चंद्रकांत हंडोरे हे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री होते. काँग्रेसमधील आक्रमक दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. चेंबूर मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा 1985 मध्ये निवडून आले होते. मुंबईचे महापौर होण्याचा मान देखील हंडोरे यांना मिळाला आहे. 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवानंतर ते काहीसे बाजुला पडल्याचे चित्र होते. मात्र, आता काँग्रेसकडून त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT