Rajya Sabha Election 2024 : अखेर सोनिया गांधींचं ठरलं; आज ‘या’ राज्यातून भरणार राज्यसभेचा अर्ज

Sonia Gandhi : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता.
Sonia Gandhi
Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले असून आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेल्या राजस्थानमधून त्या उमेदवार असतील. (Rajya Sabha Election 2024)

काँग्रेसकडून (Congress) आज राज्यसभेच्या चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थानमधून सोनिया गांधी (Sonia Gandhi) तर महाराष्ट्रात चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनू सिंघवी आणि बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह हे उमेदवार असतील.

Sonia Gandhi
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, चंद्रकांत हंडोरेंना संधी

मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तेलंगणासह मध्य प्रदेश व राजस्थानमधून त्या निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा होती. तेलंगणा काँग्रेसने सोनियांनी इथून उमेदवार व्हावे, असा ठरावही केला होता. पण अखेर त्यांनी राजस्थानवर शिक्कामोर्तब केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियांका गांधी आज सकाळीच राजस्थानमध्य दाखल झाले आहेत. काही वेळातच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेल्या होत्या.

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून 1999 मध्ये सुत्रं हाती घेतली होती. त्यानंतर पक्षाला दोनदा सत्ता मिळाली. पण 2014 नंतर पक्षातील अनेक नेते सोडून गेले आहेत. लोकसभेत पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला होता. आता प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यसभेच्या देशभरातील 15 राज्यांतील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी आहे. त्यामुळे आज आणि उद्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Sonia Gandhi
Pakistan Politics : निवडणुकीच्या चार दिवसानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान ठरला; नवाझ शरीफ यांनी केली घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com