Nepal Parliament stormed by youth after Facebook, Instagram ban; one killed in firing. sarkarnama
देश

Nepal Protest Video : फेसबूक, इन्स्टावर बंदी, जेन जी नेपाळच्या संसदेत घुसले; गोळीबारात एकाच मृत्यू

Nepal Facebook Instagram Ban : फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्यूब, व्हाॅट्अप बंदी घातल्याने नेपाळमधील तरुण संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट संसदेवर हल्लाबोल केला.

Roshan More

Nepal Protest : नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेत फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्यूब, व्हाॅट्असप या सारखे तब्बल 26 अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या बंदी नंतर सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूसह विविध शहरांमध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात जेन जीचा पुढाकार होता. जेन जी हे ज्या तरुणांना म्हटले जाते ज्यांचा जन्म 1997 से 2012 च्या दरम्यान झाला आहे.

सरकारच्या विरोधात प्रदर्शन करणारे युवक थेट नेपाळच्या संसदेत घुसले. त्यावेळी पोलिसांनी गोळीबाळ केला. त्यामुळे एक जणाचा मृत्यू झाला. तर देशभर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन पत्रकार गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. नेपाळच्या अनेक भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी चार सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हाॅट्सअप, रेडिट और एक्स अशा तब्बल 26 सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ओली यांनी युवकांना इशारा दिला की, त्यांना या आंदोलनाची त्यांना काय किंमत चुकवावी लागेल.

सरकारने बंदी घालेल्या अ‍ॅप्समागे प्रमुख कारण सांगितले जात आहे की, फेसबुक, यूट्यूब सारख्या कंपन्यांनी त्यांचे कार्यालत नेपाळमध्ये सुरू केले नाही. तसेच त्यांचे सर्व्हेर देखील नेपाळमध्ये नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT