Raman Singh Sarkarnama
देश

BJP News : सत्ता मिळताच माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप; सरकारी अधिकाऱ्यांना दिली तंबी

Raman Singh : माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नाव चर्चेत असले तरी अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

Rajanand More

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले आहे. पण चार दिवस झाले तरी पक्षाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवता आलेला नाही. त्यामुळे राज्यात अधिकाऱ्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे संकेत भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनीच दिले आहेत. मागील तारखा टाकून फाईलींना मंजूरी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसचा (Congress) विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भूपेश बघेल यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. सत्ता परिवर्तन झाले असले तरी अद्याप नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, हे अनिश्चित आहे. भाजपला मुख्यमंत्री कोण होणार, हे अद्याप ठरवता आलेले नाही. त्यामुळे सध्या छत्तीसगड प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नाव चर्चेत असले तरी अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. पण त्याआधीच त्यांनी प्रशासनावर वचक ठेवण्यास सुरूवात केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील काही अधिकारी महत्वाच्या फायलींवर मागील तारखा टाकत त्यांना मंजुरी दिली जत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी अशा सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेचा एक भाग आहात. नवीन सरकार जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत असे चुकीचे प्रकार करणे सर्वांनी थांबवावे, असा सुचक इशाराही रमण सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये डॉ. रमण सिंह हे छत्तीसगडमधील भाजप वरिष्ठ फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. पण त्यांचा वय सध्या ७१ वर्ष आहे.भाजपच्या स्ट्रॅटेजीनुसार मुख्यमंत्री होण्यात त्यांचे वयच अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT