CJI Dhananjay Chandrachud Sarkarnama
देश

Dhananjay Chandrachud : वडिलांनी दिलेल्या दोन खटल्याचे निकाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बदलले; म्हणाले," न्याय..."

Anand Surwase

Chief Justice Dhananjay Chandrachud News : सर्वोच्च न्यायालयाचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी पूर्वीचे दोन निकाल बदलल्यामुळे चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे निकाल बदलले आहेत, ते निकाल त्यांच्याच वडिलांनी दिलेले होते.

याबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला असताना चंद्रचूड म्हणाले,एक न्यायाधीश म्हणून माझे प्रशिक्षणच तशा पद्धतीने झाले आहे. त्यामुळे मी माझ्या वडिलांनी घेतलेले निर्णय देखील बदलले आहे.

बेंगळूरू येथील एका आयोजित एका कार्यक्रमात सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) हे बोलत होते. ते म्हणाले, न्याय हा न्याय असतो; एक न्यायाधीश म्हणून तुम्हाला बुद्धीचा वापर करून तो न्याय द्यायचा असतो.

त्यामुळे एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निकाल बदलत असताना तुम्हाला हे माहीत असते की हा निकाल कोणी दिला आहे. त्याप्रमाणे मलाही माहिती होते की मी माझ्या वडिलांनीच दिलेले निकाल बदलत आहे आणि मी दोन खटल्याचे निकाल बदलले असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले.

डीवाय चंद्रचूड म्हणाले, मी एडीएम जबलपूर आणि सौमित्र विष्णू या दोन खटल्यातील निकाल बदलले. कारण न्याय (Justice) हा न्याय असतो आणि तो देत असताना आपल्याला बुद्धी आणि तर्कांचा वापर करून द्यायचा असतो. तसेच एक न्यायाधीश म्हणून आमचे प्रशिक्षणच अशा प्रकारचे झालेले असते असेही चंद्रचूड यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पहिल्यादा बहुचर्चित एप्रिल 1976 मधील एडीएम जबलपूर खटल्याच्या प्रकरणात यशवंत चंद्रचूड यांच्या खंडपीठाने असा निकाल दिला होता की, आणीबाणीच्या काळात सर्व मूलभूत अधिकार रद्द केले जातात आणि नागरिक आपल्या अधिकारासाठी न्यायालयात दाद मागू शकत नाही. (Supreme Court)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर तब्बल 41 वर्षानंतर या निर्णयाविरोधात रिव्यू याचिका दाखल झाली. त्यावेळी सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी त्यांच्याच वडिलांनी दिलेला निकाल बदलला. त्याच प्रमाणे त्यांनी 1985 मध्ये सौमित्र विष्णू खटल्यात दिलेला निकाल बदलला होता. काळानुसार काही निर्णय बदलावे लागत असल्याचे मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT