BJP MLA Jaykumar Gore : 'कलेक्टर दारू पिऊन बसला होता की अधिकारी शेण खात होते?' ; ऐका भाजप आमदाराची भाषा

Satara Maan Khatav Politics : आमदार जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने आता वेगळेच राजकारण पेटणार असल्याचे दिसत आहे.
BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Maan Khatav News : साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यात दुष्काळ का जाहीर झाला नाही, असे अनेक लोक विचारत आहेत. ज्या-ज्या विहिरी पाण्याची पातळी तपासण्यासाठी निवडल्या आहेत. त्या 13 विहिरी उरमोडीच्या लाभ क्षेत्रातील आहेत. या तपासणीवेळी कलेक्टर दारू पिऊन बसला होता की तालुक्यातील अधिकारी शेण खात होते? मला माहिती नाही अशी टीका करतानाच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची जीभ घसरली आहे. या वक्तव्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप होवू लागले आहेत. आमदार गोरेंचा या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होवू लागला आहे. 

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माजी आयुक्त आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, अडीच वर्ष महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aaghadi) सरकार होतं आमचं एकच आव्हान आहे. त्या काळात लाखाचं काम केलेलं दाखवा पाच लाख रुपये तुम्हाला देऊ. त्यांचं एकही काम नाही.

यांचं भांडवल फक्त समाजाच्या विरोधी भूमिका घ्यायची. अगोदर एमआयडीसी विरोध करायचा आणि एमआयडीसी झालीच तर तेथील शेतकरी उठून बसवायचा, त्यांना आंदोलन करायला लावायचं, अशी टीका माजी आयुक्त आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यावर केली. 

BJP MLA Jaykumar Gore
Jaykumar Gore : जनतेचे 'सो काॅल्ड नेते' म्हणत जयकुमार गोरेंचा शरद पवार, रामराजे नाईक-निंबाळकरांवर निशाणा!

आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला. आम्ही सगळे सोबत आहोत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. विरोधकांची भूमिका ही निवडणूक आणि राजकारणाची आहे. आरक्षणाचा मुद्दा कायम ज्वलंत राहिला पाहिजे तर आमचं राजकारण राहील, ही भूमिका त्यांची आहे. मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका आहे.

मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका आहे. मात्र, यामध्ये सुद्धा राजकारण केलं. अगदी जरांगे- पाटलांची सभा घेतली, तरीही राजकारण केलं. तेव्हा अशा पद्धतीच्या भूमिका घेणारी ही माणसं आहेत. हे लोक मढ्यावरचे लोणी दिले, तर त्यावरही राजकारण करतील, अशी टीका आमदार गोरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कलेक्टर आहेस, बुध्दी पाजळावी...

माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न आणि अधिकाऱ्यांवर बोलताना आमदार जयकुमार गोरे यांच्या वाणीतून भलतेच उद्गार निघाल्याने आता वेगळेच राजकारण पेटणार असल्याचे दिसत आहे. यावेळी आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, उरमोडीचे पाणी वाहत आहे, तेथील पिकांची, मातीची आर्द्रता तपासली. अधिकाऱ्यांना मातीची आर्द्रता तपासायची होती, तर नदीच्या उत्तर भागातील तपासायला हवी होती.

उत्तरेतील पिकांची, मातीची तपासणी न केल्याने माण-खटाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिला. परंतु, आम्ही थांबलो नाही, आम्ही नव्याने या तालुक्याचा दुष्काळात समावेश करून घेतला.

आमच्या येथील एक देखणा गडी म्हणाला, लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला नाही. मग तुझा अभ्यास काय शेण खायला गेला होता का. लोकांची 48 हजार मते घेतलीस, तुला कळत नाही का? कलेक्टर आहेस, बुद्धी पाजळावी, अशी टीका प्रभाकर देशमुख यांच्यावर केली.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP MLA Jaykumar Gore
Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी काँग्रेसनेही ठोकले शड्डू ; पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com