Justice DY Chandrachud  Sarkarnama
देश

Supreme Court: सरन्यायाधीशांच्या समोरच वकिलांनी काढल्या व्हिस्कीच्या दोन बाटल्या; अन्...

Justice DY Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील हसत त्या वकिलांची फिरकी घेतली.

Anand Surwase

Delhi News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे सातत्याने चर्चेत येत आहेत. नुकतेच कोर्टात आवाज चढवून बोलणाऱ्या एका वकिलाची त्यांनी कानउघडणी केली होती. हे प्रकरण अजून ताजे असतानाच आता एका ज्येष्ठ वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात चक्क सरन्यायधीश चंद्रचूड यांच्यासमोरच व्हिस्कीच्या बाटल्या आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाटल्या पाहून आवाक झालेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील मोठ्याने हसत त्या वकिलांची फिरकी घेतली.

या प्रकरणाची नेमकी माहिती अशी, की मध्यप्रदेशातील एका दारू निर्मात्या कंपनीचा अन्य एका पेय पदार्थ निर्मात्या कंपनीसोबत ट्रेड मार्कचा वाद सुरू होता. यामध्ये इंदोरस्थित जेके एंटरप्रायजेस या कंपनीने 'लंडन प्राइड' या बँडच्या नावाने एक पेय पदार्थ तयार केले होते. मात्र पेरनोड रेकॉर्ड या वाईन निर्मात्या कंपनीने लंडन प्राईड या ट्रेडमार्कच्या नावाने पेय पदार्थ बनवण्यास विरोध करत याचिका दाखल केली होती. मात्र मध्य प्रदेशच्या न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या निकाला विरोधात दारू निर्मात्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. हे प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे आले होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठाकडे सुनावणी सुरू असतानाच वकील मुकूल रोहतगी यांनी या ट्रेड मार्कच्या प्रकरणातील दोन बाटल्या थेट चंद्रचूड यांच्यासमोर सादर केल्या. यामध्ये एका बाटलीत व्हिस्की होती. वकिलांनी सादर केलेल्या व्हिस्कीच्या दोन्ही बाटल्या पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड आवाकच झाले आणि मोठ्याने हसत त्यांनी थेट रोहतगींना म्हणाले, तुम्ही दारुच्या बाटल्या सोबत घेऊन आलात ? असा सवाल करत त्यांची फिरकी घेतली.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना वकील रोहतगी म्हणाले, या ट्रेडमार्क प्रकरणात दोन्ही बाटल्यांमधील समानता दर्शवण्यासाठी आम्हाला या बाटल्या आणाव्या लागल्या. तसेच या प्रकरणात ट्रेडमार्कचे उल्लंघन कसे काय होईल अशी बाजू मांडली. त्यावर चंद्रचूड यांनी हे प्रकरण ट्रेड ड्रेस संदर्भातील असल्याचे सांगत मध्यप्रदेश न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

तसेच या प्रकरणी दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणीसाठी तारीख देण्यात आली. या सर्व प्रकरणात कोर्टात सादर करण्यात आलेल्या बाटल्या तिथेच असल्याने वकील रोहतगी यांनी त्या बाटल्या घेऊन जाण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT