Chief Justice DY Chandrachud : '23 वर्षांत असं कधीच झालं नाही;' सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भरकोर्टात भडकले

Court Room News : धनंजय चंद्रचूड वकिलावर संतापले...
Chief Justice DY Chandrachud
Chief Justice DY Chandrachud Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court News : शांत आणि कडक शिस्तीचा स्वभाव अशी ओळख असलेले भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना बुधवारी भरकोर्टातच संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याचिकेच्या लिस्टिंगसंदर्भात एका वकिलाचा चढलेला आवाज पाहून ते चांगलेच भडकले. वकिलांची वागणूक पाहून त्यांनी आपल्या 23 वर्षांच्या करिअरमध्ये असे कधी झाले नाही, निवृत्तीच्या वर्षातही असे होणार नाही, अशा शब्दांत वकिलाला ठणकावले.

सरन्यायाधीश चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) हे कडक शिस्तीचे असल्याने न्यायालयात (Supreme Court) नियमांचे पालन होत नसल्यास ते ज्येष्ठ वकिलांनाही धारेवर धरत असल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. बुधवारीही एका वकिलाच्या वागणुकीमुळे चिडल्याचे दिसले. याचिकेच्या लिस्टिंगबाबत वकिलाकडून बाजू मांडली जात असताना जोरजोरात बोलत होते, हे पाहूनच सरन्यायाधीशांनी त्यांना रोखले.

Chief Justice DY Chandrachud
Truck Drivers Strike : ट्रकचालकाची औकात काढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी

‘तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आहात. आवाज चढवून बोलू नका. तुमचा आवाज कमी करा. नाहीतर कोर्टातून बाहेर काढीन,’ असे चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तुम्ही नेहमी कुठल्या न्यायालयात असता, त्यांच्याशीही असेच ओरडून बोलता का, असा सवालही वकिलाला केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टातील मर्यादा आणि नियमांवर बोट ठेवत सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलाला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘तुम्हाला वाटत असेल की, आवाज वाढवला तर आम्हाला घाबरवू शकता. मग तुम्ही चुकीचे आहात. मागील 23 वर्षांत असे झाले नाही. माझ्या करिअरमधील शेवटच्या वर्षात तर असे होणारच नाही.’

Chief Justice DY Chandrachud
Chief Minister in Jail : सोरेन, केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार; थेट मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकता येते का?

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या तंबीनंतरही वकिलांचा आवाज कमी न झाल्याने ते अधिकच चिडले. ‘तुम्ही आता एकदम गप्प बसा. आताच या कोर्टातून बाहेर जा. तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही,’ असे चंद्रचूड यांनी सुनावले. चंद्रचूड यांचा चढलेला पारा पाहून वकिलांनी माघार घेत लगेच माफी मागितली आणि विनम्रपणे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सरन्यायाधीश यांनी यापूर्वी वकिलांना ठणकावल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये वादी-प्रतिवादी किंवा वकिलांना सुनावले आहे. कोर्टात चढ्या आवाजात बोलल्यामुळे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनाही चंद्रचूड यांनी सुनावले होते.

Chief Justice DY Chandrachud
Arvind Kejriwal : तिसऱ्या नोटीशीनंतर तरी केजरीवाल ED चौकशीला आज हजर राहतील का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com