Thackeray Vs Shinde : Jairam Ramesh Sarkarnama
देश

Jairam Ramesh on One Nation One Election : 'वन नेशन, वन इलेक्शन' बाबत काँग्रेसची प्रतिक्रिया; जयराम रमेश यांचं मोठं विधान, म्हणाले...

Congress on One Nation One Election : एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात सादर केले जाणार असल्याची चर्चा आहे.

Mayur Ratnaparkhe

One Nation One Election Bill News : वन नेशन वन इलेक्शन बाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मागणी केली आहे की, 'जे विधेयक येईल, ते जेपीसीकडे पाठवले जावे, हा काँग्रेसचा विचार आहे. हम वन नेशन, वन इलेक्शन विरोधात आहोत. हे लोकशाहीविरोधात आहे, असंविधानिक आहे, हे लोकशाहीला संपवणारे विधेयक आहे, याचा आम्ही विरोध करू.'

वन नेशन, वन इलेक्शनच्या दिशेने पंतप्रधान मोदींच्या(PM Modi) नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठं पाऊल उचललं आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली, ज्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावास मंजुरी दिली गेली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, लवकरच हे विधेयक संसदीय पटलावर मांडले जावू शकते.

सद्यस्थितीस देशात राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या वेळी होते. तर लोकसभा निवडणूकही(Loksabha Election) वेगळी होते. तर सरकारचा उद्देश शंभर दिवसांच्या आतच शहरी संस्था आणि पंचायत निवडणुकीसोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकसाथ करणे आहे.

सध्या याच्याशी निगडीतच प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशातच माजी राष्ट्रपीत रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कमिटीने आपला अहवाल सादर केला होता. तर सरकारने सप्टेंबरमध्येच रामनाथ कोविंद कमिटीच्या शिफारशी स्वीकरल्या आहेत.

एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात सादर केले जाणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी खासदारांना व्हीप जारी केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. असे असले तरी पुढील दोन दिवस लोकसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यासाठी हा व्हीप जारी केल्याचे सांगितले जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT