Raja Pateria
Raja Pateria Sarkarnama
देश

Narendra Modi : मोदींची हत्या करा म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची आता सारवासारव...

सरकारनामा ब्यूरो

Madhya Pradesh Congress : मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशाचं संविधान वाचवायचं असेल तर मोदी यांची हत्या करावी लागेल. हत्या करणं म्हणजे त्यांना निवडणुकीत हरवणं, असं काँग्रेस नेते मंत्री राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी म्हंटलं. त्यांच्या या वक्तव्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राजा पटेरिया हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पटेरिया म्हणतात, ''मोदी इलेक्शन खतम कर देगा. मोदी धर्म, जाती आणि भाषेच्या आधारावर तुकडे करतील. त्यामुळे अल्पसंख्यांक आणि आदिवासींचे भावी जीवन संपून जाईल. त्यामुळे संविधान वाचवायचं असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा. हत्या म्हणजे याचा अर्थ मोदींना निवडणुकीत हरवणं होय असं होय'', असं वक्तव्य त्यांनी केलं.

काँग्रेसकडून वक्तव्याबाबत स्पष्टीकरण

या सर्व प्रकरणावर काँग्रेसकडून (Congress) स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ''पटेरिया यांचे वक्तव्य नीट ऐका. त्यांना मारून नव्हे तर निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव करून संविधान वाचवण्याबाबत ते बोलत होते. मात्र भाजपचे (BJP) नेते खोटी माहिती पसरवत आहेत, असं ट्विट मध्य प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

वक्तव्यानंतर सारवासारव...

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, मी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पराभव करण्याबाबत बोलत होतो, असं म्हणत पटेरिया यांनी आपल्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर त्यांच्यावर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT