Beed News : गजानन कारखाना सुरु करुन पवारांनी शेतकऱ्यांचे आश्रु पुसले ; मरेपर्यंत त्यांचीच साथ

Ncp : शरद पवारांनी माझ्यासारख्या नवख्या आणि सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची धमक दाखविली.
Mla Sandip Kshirsagar Wish Sharad Pawar news, Beed
Mla Sandip Kshirsagar Wish Sharad Pawar news, BeedSarkarnama
Published on
Updated on

Mla Sandip Kshirsagar News : गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला नवगण राजुरी येथील गजानन सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद्मभूषण खासदार Sharad Pawar शरद पवार यांच्यामुळे सुरु झाला. हजारो शेतकऱ्यांचे आश्रु पुसण्याचे काम पवारांमुळे झाले.

Mla Sandip Kshirsagar Wish Sharad Pawar news, Beed
Pankaja Munde : राजकारणात संयम महत्वाचा, तो माझ्याकडे आहे..

त्या शेतकऱ्यांचे आशिर्वादच शरद पवारांची ताकद असल्याची भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. (Beed) आपण मरेपर्यंत त्यांची साथ सोडणार नसल्याची ग्वाही देखील क्षीरसागर यांनी यावेळी दिली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Ncp) राष्ट्रवादी भवन येथे व्हर्च्युअल रॅली निमित्त झालेल्या कार्यक्रमात क्षीरसागर बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड मतदार संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. मात्र, शरद पवारांनी माझ्यासारख्या नवख्या आणि सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची धमक दाखविली. अशी धमक अन्य कुठल्याही नेत्यात नाही.

नवगण राजूरीचा कारखाना सुरु करुन शरद पवारांनी शेतकऱ्यांना जणू वरदानच दिले आहे. मरेपर्यंत पवारांची साथ सोडणार नाही. त्यांच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यातून व्हर्च्यूल पद्धतीने पवारांच्या वाढदिवसांच्या मुख्य कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी जोडले गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com