Nanded Gramsevak News :नांदेड जिल्ह्यातील तब्बल ४० ग्रामसेवकांना एका दणक्यात घरी पाठवण्यात आलंय. तब्बल ४० ग्रामसेवकांचं निलंबन करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली असून नांदेडमध्ये देखील वातावरण तापलं आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर ४० ग्रामसेवकांच निलंबन करण्यात आल्याने राज्यभरात चर्चा देखील रंगली आहे. मात्र या ४० ग्रामसेवकांचं निलंबन का करण्यात आलं? जाणून घेऊयात...
मुखेडमधील दोन ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मनसे तर्फे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेकडून (Nanded ZP) या संदर्भात चौकशी लावण्यात आली. मात्र या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करू नये, अशी मागणी करत ग्रामसेवक संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये तब्बल ४० ग्रामसेवक सहभागी झाले होते.
यानंतर आंदोलन करणाऱ्या या ४० ग्रामसेवकांच निलंबन करण्यात आलं. ही कारवाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी केली. त्यानंतर ४० ग्रामसेवकांचे करण्यात आलेले निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी ग्रामसेवकांनी करत पुन्हा आंदोलन केले.
मात्र या प्रकरणाची थेट दखल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी घेत चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे पाच सदस्यीय समिती नेमकं काय अहवाल देणार? यावर आता या ४० ग्रामसेवकांचे (Gramsevak) भवितव्य अवलंबून असणार आहे.
दरम्यान, मनसेने (MNS) दोन ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देखील काही कारवाई होत नसल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ठोंबरे यांनी दखल घेत ४० जणांच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र या सर्व प्रकारानंतर नांदेडमध्ये वातावरण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.