Delhi : भाजप दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कडून सात आमदारांशी संपर्क साधण्यात आला. प्रत्येक आमदाराला 25 कोटी रुपये देण्यात येतील आणि सरकार पाडण्यात येईल, असा गंभीर आरोप 'आप' सरकारमधील शिक्षणमंत्री आतिशी यांनी केला होता. आता या प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेचे पथक आज (रविवारी) सकाळी मंत्री आतिशी यांच्या घरी नोटीस देण्यासाठी पोहोचली होती.
गुन्हे शाखेचे पथक जेव्हा आतिश (Atishi) यांच्या घरी पोहचले तेव्हा त्या घरी नव्हत्या. त्यामुळे नोटीस न देताच पथकला परत यावे लागले. या आधी देखील गुन्हे शाखेचे पथक मंत्री आतिशी यांच्या घर गेले होते. मात्र, त्यावेळी त्या चंदीगडमध्ये होत्या. या प्रकरणी दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाला देखील पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यामध्ये आमदार खरेदीचे जे आरोप करण्यात आले आहेत त्याचे पुरावे द्या, ज्या सात आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे सांगा याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आतिशी यांनी केवळ अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्या ईडी चौकशीवरून लक्ष हटवण्यासाठी आमदार खरेदीचा आरोप केला आहे. भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशीसाठी गेले तर आतिशी गायब होत्या. आरोप करून अरविंद केजरीवाल आणि आतिश स्वतः फसल्या आहेत. मात्र, त्यांनी आरोप केला आहे तर त्यांना पुरावे दावे लागतील, असे भाजपचे दिल्लीतील नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले आहे.
आतिशी यांना नोटीस देण्याच्या आधी शनिवारी (ता.3) गुन्हे शाखेचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी पोहोचले होते. नोटीसच्या माध्यमातून आमदार खरेदीच्या आरोपवांवर तीन दिवसांमध्ये पुरावे आणि म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.