Donald Trump Team Sarkarnama
देश

Donald Trump Team: कमला हॅरिस यांना पराभूत करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना 'नारीशक्ती'वरच भरवसा; 4 महिलांकडे मोठी जबाबदारी

Donald Trump women in key positions campaign strategy: राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत पोहणाऱ्या ट्रम्प यांना मात्र नारीशक्तीवरच भरवसा आहे. आपल्या टीममध्ये घेतलेल्या चार महिलांकडे त्यांनी अतिमहत्वाच्या जबाबदारी सोपवल्या आहेत.

Rashmi Mane

US Election 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत केले. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या पहिल्या निवडणुकीतही हिलरी क्लिंटन या महिला उमेदवार विरोधात होत्या.

दोन निवडणुकांमध्ये महिलांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत पोहणाऱ्या ट्रम्प यांना मात्र नारीशक्तीवरच भरवसा आहे. आपल्या टीममध्ये घेतलेल्या चार महिलांकडे त्यांनी अतिमहत्वाच्या जबाबदारी सोपवल्या आहेत.

माजी खासदार तुलसी गबार्ड

अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी यांची ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षातून रिपब्लिकन पक्षात आलेल्या तुलसी यांनी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.

तुलसी यांनी 2022 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र नंतर त्यांनी आपले नाव मागे घेतले. 2022 मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आणि त्या रिपब्लिकन पक्षात आल्या. तुलसी या अमेरिकेतील पहिल्या हिंदू महिला खासदार आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा त्यांनी अनेकदा निषेध केला आहे.

एलिस स्टेफानिक

ट्रम्प यांच्या टीममधील दुसरे नाव म्हणजे एलिस स्टेफानिक. न्यूयॉर्कच्या सिनेटर असणाऱ्या स्टेफानिक यांची अमेरिकेच्या राजदूत पदासाठी निवड केली आहे. त्या खरे तर ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक आहेत. तिने हार्वर्डमधून शिक्षण घेतले असून माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या कार्यकाळातही त्यांनी प्रशासनातही काम केले आहे. त्यांच्या निवडीची घोषणा करताना ट्रम्प यांनी त्यांना अमेरिकेचे 'फर्स्ट फायटर' म्हटले होते.

क्रिस्टी नोएम

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममधील आणखी एक धडाकेबाज महिला म्हणजे क्रिस्टी नोएम. डकोटाचे गव्हर्नर क्रिस्टी यांना ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात होमलँड सिक्युरिटी मंत्री बनवले आहे. 2018 मध्ये त्या प्रथमच दक्षिण डकोटाच्या पहिल्या महिला गव्हर्नर झाल्या. त्या त्यांच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यामुळे तिला सीमेची सुरक्षा, सायबर सुरक्षा, दहशतवाद यासह अनेक महत्त्वाच्या विषयांच्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीमध्ये, नोएम टॉम होमन यांच्यासोबत त्या काम करणार आहेत. ज्यांची नुकतीच अमेरिकेच्या बॉर्डर झार म्हणून निवड झाली आहे.

सुझी वाइल्स

अमेरिकेत ट्रम्प यांच्या 2.0 च्या कार्यकाळात सुजाना उर्फ ​​सुझी वाइल्स यांची चीफ ऑफ स्टाफ या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदासाठी निवड झाली आहे. व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.

तज्ज्ञांच्या मते, व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच एका महिलेची या पदावर नियुक्ती करून ट्रम्प यांनी महिला मतदारांमध्ये मोठा संदेश दिला आहे. खरे तर संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर महिलांशी संबंधित विविध आरोप होत राहिले. तसेच अनेक महिला सेलिब्रिटींनी ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या विरोधात प्रचार केला होता.

सुझीबद्दल बोलतांना ट्रम्प म्हणाले, सुझी विल्स यांच्यामुळे मला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय विजय मिळवून दिला आहे. 2016 आणि 2020 मधील माझ्या यशस्वी मोहिमांचा त्या एक अविभाज्य भाग होत्या. ती कणखर, हुशार आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी ती अथकपणे काम करत राहील. युनायटेड स्टेट्सच्या इतिहासातील पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून सुझी यांनी काम करणे हा त्यांच्यासाठी एक योग्य सन्मान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT