Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah News : शिंदेंचा राजीनामा अन् अमित शहांनी दिला शिवसेना खासदारांना 'हा' सल्ला

Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेनेच्या खासदारानी दिल्लीत भेट घेतली. यावेळी शाह यांनी येत्या काळात एकत्रितपणे काम करण्याची सूचना दिली आहे.

Sachin Waghmare

Political News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वादळापुढे महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला आहे. महायुतीने मोठा विजय संपादन करीत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक दिग्ग्ज मंडळीला पराभावला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेनेच्या खासदारानी दिल्लीत भेट घेतली. यावेळी शाह यांनी येत्या काळात एकत्रितपणे काम करण्याची सूचना दिली आहे. (Amit Shah News)

राज्यातील शिवसेना खासदाराचे शिष्टमंडळ बुधवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी गेले होते. सायंकाळी त्यांच्या सोबतची बैठक संपली. या बैठकीवेळी त्यांनी सर्व खासदारांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरच होत आहेत.

त्यासोबतच येत्या काळात महापालिका निवडणुकीची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात कमी करीत असतां सर्वांनी एकदिलानं काम करायचं आहे. शिवसेना भाजपसोबत मिळून महापालिका निवडणूकीला सामोरे जायचे आहे, असेही यावेळी अमित शहांनी शिवसेना (Shivsena) खासदारांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ते केंद्रात किंवा राज्यात सत्तेत कोणते पद घेणार, याची उत्सुकता लागली आहे

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाबाबात दावा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना केंद्रात जाण्याची ऑफर दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT