
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. बहुमत असल्याने लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र महायुतीच्या विजयाची व महविकास आघाडीच्या पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यामध्ये विधानसभेच्या 132 पैकी 75 जागा या भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला यश आल्याने मिळवता आल्या. त्यामध्ये बूथ टू बूथ मार्किंग, बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर या जागेवर विजय मिळवता आला असल्याचा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केला आहे. (Assembly Election News)
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठे अपयश आले होते. त्यामुळे या ठिकाणी प्रथम महाविकास आघाडीने सेट केलेला नरेटिव्ह खोडून काढण्यात आला. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात आली. प्रत्येक मतदारांच्या गाठभेटीवर भर देण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात आल्या त्याचा फायदा या निवडणुकीत झाला असल्याची माहिती भाजपचे (BJP) राज्य उपाध्यक्ष रमेश मेंढे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
भाजपकडून राज्यातील विधानसभा जागेचे ए, बी, सी, डी अशा चार कॅटेगिरीमध्ये वर्गीकरण केले होते. या ए, बी, सी, कॅटेगरीत जे वीक बूथ होते. या वीक बूथमध्ये मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे काम कठीण होते. पण त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदान कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांना विनंती करीत होते.
त्यासोबतच बुथमध्ये यादी वाचनाचा एक मोठा कार्यक्रम होता. यादीचे वाचन करून त्या बूथमध्ये त्या परिवारात राहणारे किती सदस्य आहेत. हा परिवार आपल्याला मतदान करतो की नाही, याचा अंदाज घेत त्यांना आपल्या बाजूने तयार केले. त्यानुसार प्रत्येक एक-एक पेजला एक-एक प्रमुख नेमण्यात आला. प्रत्येक पानावरील 30 मतदारांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांना भेटून बूथपर्यंत आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांना पन्ना प्रमुख म्हटले जात होते. त्या मंडळींनी खूप मेहनत घेतली.
प्रत्येक मतदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना योजनांचा लाभ मिळत आहे की नाही ? याची माहिती घेतली. त्याशिवाय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत असा संपर्क साधण्यात आला. लोकसभेत आम्ही मोठ्या प्रमाणात हे काम केलं होतं म्हणजे लाभार्थ्यांचा संमेलन घेतलं होतं पण जेव्हा लक्षात आलं की यश कमी मिळते. त्यामुळे या वेळेला या राज्याच्या निवडणुकीमध्ये लाभार्थी संमेलनाचे छोट्या बैठकीत रूपांतर करण्यात आले.
यामध्ये पंतप्रधान आवास योजना, लाडकी बहीण योजना, उज्वला गॅस योजना व शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत असेल ज्या-ज्या प्रकारचे लाभ केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे ज्या घटकांनी घेतले. त्या सगळ्या घटकांना एकत्रित आणून त्यांच्यासमोर या सगळ्याची बैठक घेऊन काम केले. प्रत्येक घरामध्ये जाऊन राज्य सरकारने केलेलं काम पोहोचवले. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे कॅम्पेन राबविण्यात आले. त्याशिवाय विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजनेला केलेला विरोध त्यांच्या लक्षात आणून दिला. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत महायुतीला झाला.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे जे बूथ 'सी' कॅटेगिरीमध्ये घसरले होते. त्यांना 'बी' कॅटेगरीत तर 'बी' कॅटेगरीमधील बूथ 'ए' कॅटेगरीमध्ये नेण्याची किमया भाजप कार्यकर्त्यांनी केली आणि तब्बल 75 विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेच्या निकालानंतर भाजपने 'सी' आणि 'बी' कॅटेगिरीच्या बूथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. नवीन मतदार नोंदणी करून, लोकसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना भाजप किंवा महायुतीसाठी मतदान करण्यास प्रोत्साहित करून सी कॅटेगिरीचे दहा टक्के बूथ बी कॅटेगिरीमध्ये नेले. तर बी कॅटेगिरीचे सुमारे 20 टक्के बूथ ए कॅटेगरीत परावर्तित केले. प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांना त्यांच्या बूथच्या यादीचे वाचन बंधनकारक केले, त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.