devendra Fadnavis-Basavraj bommai sarkarnama
देश

Devendra Fadnavis News : हायकमांडच्या निर्णयाआधीच फडणवीसांनी जाहीर केले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव

भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील नेत्यांचे मत जाणून घेते आणि त्यानुसार कार्य करते.

सरकारनामा ब्यूरो

विजापूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) हायकमांडने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढील मुख्यमंत्रीही बसवराज बोम्मई (basvaraj bommai) हेच असतील, असे सांगितले. विजापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, कर्नाटकात त्या वक्तव्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. (Even before High Command's decision, Fadnavis announced name of Chief Minister of Karnataka)

फडणवीस म्हणाले की, ‘निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. पुढील सरकारचं नेतृत्व बोम्मईच करतील, यात शंका नाही. बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात असल्याचं अमित शहा यांनी दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं. ते पुढील कार्यकाळासाठी या पदावर कायम राहतील, असं सांगत फडणवीसांनी आपल्या वक्तव्याचा बचाव केला.

फडणवीसांच्या विधानावर भाजपचे प्रदेश नेते म्हणाले, ‘‘हा कर्नाटकचा प्रश्न आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील नेत्यांचे मत जाणून घेते आणि त्यानुसार कार्य करते. फडणवीस यांच्या मताचा यापूर्वी अनेकदा आदर केला गेला आहे.’’

बेळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी वेगळेच विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘‘परिस्थितीनुसार पक्षाचे हायकमांड मुख्यमंत्र्यांची निवड करेल. जे नाव सर्व आमदारांना मान्य असेल. संजय पाटील यांनी २००८ आणि २०१३ मध्ये दोनदा बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे. फडणवीस यांनी बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी कशी जाहीर केली, हे मला माहीत नसल्याचंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, ‘भाजपच्या महाराष्ट्र शाखेचा कर्नाटकातील मराठी भाषिकांना पाठिंबा आहे. पक्ष त्यांच्या राजकीय कारभारात हस्तक्षेप करणार नाही. महाराष्ट्र भाजप शाखेनेही ज्या मतदारसंघात महाराष्ट्र समर्थक संघटना तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उभे केले आहेत, तिथे प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT