Sonia Gandhi
Sonia Gandhi Sarkarnama
देश

Sonia Gandhi : सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत; म्हणाल्या, "आता थांबण्याची वेळ..."

सरकारनामा ब्युरो

Raipur Congress Session : राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा आहे. आजच्या दिवशी या अधिवेशनात काँग्रेसच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

पहिली व मोठी घटना म्हणजे या अधिवेशनात काँग्रेसच्या सोनिया गांधी Sonia Gandhi यांनी आपल्या राजकीय प्रवासातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावेळी गांधी भारत जोडो यात्रेसह माझ्या राजकीय प्रवास थांबविण्याची वेळ आली, असे म्हणाल्या.

दुसरी घटना म्हणजे काँग्रेसने आपल्या घटनेत काही दुरुस्त्या करण्याचे निर्णय घेतले आहेत. या दुरुस्तीच्या माध्यमातून काँग्रेसने समाजातील सर्व घटकांना पक्षात समावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडच्या रायपूर (Raipur) येथे सुरू आहे. त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजकीय प्रवासातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी सोनिया गांधीचा आभार प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांच्या राजकीय प्रवासाचा लघुपट दाखविण्यात आला. त्यात त्यांनी २५ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने मिळविलेले यश आणि लोकांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांची माहिती होती.

त्यानंतर सोनिया गांधी Sonia Gandhi यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी २००४ आणि २००९ मधील विजय महत्त्वाचा होता. त्यापेक्षाही जास्त आनंद भारत जोडो यात्रेतून लोकांनी दिलेल्या प्रतिसादाचा आहे. त्या भारत जोडो यात्रेसोबत माझ्या थांबण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या, "डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सामर्थवान नेतृत्वाखाली काँग्रेसने देशात चांगले यश मिळविले. त्याचा मला वैयक्तिक खूप आनंद आहे. त्यापेक्षाही जास्त आनंद आहे तो म्हणजे राहुल गांधींच्या Rahul Gandhi भारत जोडो यात्रेसोबत माझा राजकीय प्रवास थांबत आले. यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या मनात बंधुभाव जागृत झाला.

अखिल भारतीय काँग्रेस (Congress) परिषदेमध्ये काँग्रेसच्या घटनेत काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यातून काँग्रेस पक्षात समजातील सर्व घटकांना समावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कमिटीतील सदस्य संख्या १२४० वरून १६५३ पर्यंत वाढविली जाणार आहे. एआयसीसी (अखिल भारतीय काँग्रेस कमिटी)मध्ये ५० टक्के महिलांना स्थान मिळाणार आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीची सदस्यसंख्या २३ वरून ३५ करण्यात येणार आहे. ५० टक्के जागा एससी, एसटी, ओबीसींसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा सदस्य थेट ब्लॉक प्रतिनीधी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT