Himanta Biswa Sarma On WC Final Sarkarnama
देश

Himanta Biswa Sarma On WC Final : 'वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव इंदिरा गांधींमुळे... ; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे!

Himanta Biswa Sarma On WC Final : राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना पनौती असे म्हटले होते.

Chetan Zadpe

Delhi News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या ICC विश्वचषक अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आणि यावरून राजकारणही तापले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी टीम इंडियाच्या पराभवाचा संबंध माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी जोडला. टीम इंडियाचा पराभव झाला त्या दिवशी इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस होता, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

एवढेच नाही तर यासोबतच त्यांनी बीसीसीआयला विनंती केली की, "नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी भारताचे अंतिम सामने होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे, उलट-सुलट प्रतिक्रिया देणारे यांचा विरोधी पक्षांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले हिमंत बिस्वा सरमा?

“आम्ही सर्व सामने जिंकलो आणि अंतिम फेरीत हरलो. आपण सामना का हरलो याचा शोध घेतला तेव्हा मला दिसले की वर्ल्ड कप फायनल सामना हा इंदिरा गांधी यांच्या जन्मदिवशी होता. इंदिरा गांधींच्या वाढदिवसाला आम्ही विश्वचषक फायनल खेळलो आणि देश हरला. मी बीसीसीआयला विनंती करेन की कृपया गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असेल, त्या दिवशी भारताचा सामना आयोजित करू नये. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून मी हे शिकलो आहे, असा खोचक सूर सरमा यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय प्रकरण आहे?

टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि तेव्हापासून सोशल मीडियावर पनौती हा शब्द ट्रेंड होऊ लागला. त्यानंतर एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना पनौती असे म्हटले होते. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT