World Cup Final : वर्ल्ड कप फायनलला राजकीय फिव्हर; शिर्डीत साईबाबांना प्रार्थना, नगरमध्ये गणेशाची महाआरती....

Nagar Political Leader's Event : हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी भिंगार शहरातील रोकडोबा मंदिरात तिरंगा झेंडा उंचावत हनुमान चालिसाचे पठण केले.
World Cup Final
World Cup Final Sarkarnama

Nagar News : भारत आज १९ वर्षांपूर्वीचा बदला घेणार का? अहमदाबादमध्ये आपण आज ऑस्ट्रेलियाला हरवणार का? रोहित आज रो‘हिट’ मारणार का? शमी पुन्हा पाच विकेट घेणार का? असे अनेक प्रश्न अवघ्या भारतवर्षाला आज पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारनंतर मिळणार असली तरी उत्सुकता आणि धाकधूक अशा वेळी देवाचा धावा केवळ सामान्य क्रिकेट रसिकांकडूनच सुरू नसून यात राजकीय नेतेमंडळीही मागे नाहीत. याचाच प्रत्यय आज नगर जिल्ह्यात येत आहे. (Prayers in Shirdi for India's victory, Maha Aarti in the Nagar)

नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी शहराचे ग्रामदैवत श्री गणेश विशाल मंदिरात महाआरती करत भारताच्या विजयाचे साकडे घातलं. या महाआरतीला अनेक राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते. शहरातील हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी भिंगार शहरातील रोकडोबा मंदिरात तिरंगा झेंडा उंचावत हनुमान चालिसाचे पठण केले. शहरातील वडिया पार्क मैदानावर आज पहाटे अनेक युवक-ज्येष्ठ नागरिक भारतीय टीमच्या निळ्या टी शर्टच्या पेहरावात ‘मॉर्निंग वॉक’ला काही वेगळ्याच जोशात दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

World Cup Final
Abhijit Patil Announced FRP : अभिजित पाटलांनी शरद पवारांसमोर दिलेला शब्द खरा केला; पण...

शिर्डीत आज स्थानिक नागरिक आणि साईंच्या दर्शनाला आलेले भक्त द्वारकामाई मंदिरात प्रार्थना करून भारताच्या विजयासाठी साईंना आर्जव करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सचिन तांबे यांनी दिली. भक्तांनी केलेली प्रार्थना साईबाबा नेहमी कबूल करतात, या भावनेतून बाबांचे आयुष्यभर वास्तव्य ज्या द्वारकामाई मस्जिदमध्ये राहिले, तिथे साईभक्त बाबांची आरती करून भारताच्या विजयाची प्रार्थना करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.

एकीकडे प्रार्थना, महाआरती, होमहवन सुरू असताना प्रत्यक्ष मॅचचा आनंद क्रिकेट रसिकांना घेता यावा; म्हणून कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी भव्य स्क्रीन उभारली आहे. कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ ही स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहण्याचा आनंद क्रिकेट रसिकांना घेता येणार आहे.

World Cup Final
MLA London Tour : राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; १२ आमदार निघाले लंडन दौऱ्यावर!

एकूणच, भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचचा फिव्हर संपूर्ण नगर जिल्ह्यात दिसून येत असून वातावरण क्रिकेटमय झाले आहे. त्यात क्रिकेटप्रेमींना प्रोत्साहित करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी करताना दिसत आहेत. यातून निर्माण झालेला उत्साह शिगेला पोचला आहे.

World Cup Final
Ram Shinde Advice to Son : ‘तू स्टेजवर (राजकारणात) यायची घाई करू नको’; व्यासपीठाकडे निघालेल्या मुलाला राम शिंदेंचा सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com