CAA certificates Allotment  sarkarnama
देश

CAA News : मोठी बातमी! सीएएद्वारे पहिल्यांदाच 14 जणांना भारतीय नागरिकता

Roshan More

CAA Rules : नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (सीए) अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या कायद्यात मुस्लिमांचा समावेश नाही. त्यामुळे मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. ऐन लोकसभा निवडणुकीत Loksabha Election सीएए कायद्यानुसार 14 जणांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विदेशी मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

नागरिक (संशोधन) कायद्याची CAA अधिसूचना जारी करण्यात आली होती. या अधिसूचनेनंतर पहिल्यांदाच नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी या प्रमाणपत्राचे वाटप केले.

मार्च महिन्यात अधिसूचना

2019 मध्ये संसदेत सीएए कायदा पास झाला होता. मात्र, त्यानंतर देशभर आंदोलन झाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यामुळे देशभर सीएए कायदा लागू झाला होता.या कायद्यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानामधील भारतात आलेल्या मुस्लिम धर्मियांना वगळता इतर अल्पसंख्यांक नागरिकत्व देण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुठल्या धर्मांचा समावेश

या कायद्यानुसार मुस्लिम धर्मियांना वगळण्यात आले असले तरी सहा अल्पसंख्यांक समाजातील लोकांना नागरिकत्व मिळणार आहे. त्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, खिश्चन आणि शीख या 6 धार्मिक अल्पसंख्यांकांचा समावेश असणार आहे.नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणे आवश्यक होते. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT